शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

क्रिप्टो फसवणूक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; देशभरात 60 ठिकाणी छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:09 IST

CBI Raid : सीबीआयने पुणे, नांदेड, कोल्हापूरसह अनेक मोठ्या शहरांमध्ये छापे टाकले.

CBI Raid : गेल्या काही काळापासून क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीची प्रकरणे वाढली आहेत. याला आळा घालण्यासाठी सरकारकडून सातत्याने पाऊले उचलली जात आहेत. दरम्यान, आता CBI ने अशा क्रिप्टो फसवणूक प्रकरणांमध्ये देशभरात 60 ठिकाणी छापे टाकले. पुणे, नांदेड, कोल्हापूर, दिल्ली एनसीआर, चंदीगड, बंगळुरुसह अनेक मोठ्या शहरांमध्ये छापे टाकण्यात आले. यादरम्यान, बनावट वेबसाइट्सद्वारे फसवणूक केल्याचे उघड झाले. 

कसा झाला क्रिप्टोकरन्सी घोटाळा ?क्रिप्टोकरन्सीशी संबंधित हा घोटाळा 2015 मध्ये सुरू झाला, ज्यामध्ये अमित भारद्वाज (मृत), अजय भारद्वाज आणि त्यांच्या एजंटचा समावेश होता. या लोकांनी GainBitcoin आणि इतर अनेक नावांनी वेबसाइट तयार केल्या आणि लोकांना पॉन्झी स्कीम अंतर्गत क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायला लावली होती. या सर्व वेबसाइट्स व्हेरिएबलटेक पीटीई लि. नावाच्या कंपनीद्वारे नियंत्रित केल्या जायच्या. 

मोठा परतावा देण्याचे आश्वासन दिले होते?क्रिप्टोकरन्सी फसवणूक करणारे अमित भारद्वाज (मृत) आणि अजय भारद्वाज यांनी गुंतवणूकदारांना या योजनेत 18 महिन्यांसाठी बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले होते. त्या बदल्यात त्यांनी 10 टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. गुंतवणूकदारांना एक्सचेंजेसमधून बिटकॉइन खरेदी करण्यासाठी आणि "क्लाउड मायनिंग" कराराद्वारे GainBitcoin सह गुंतवणूक करण्यास देखील प्रोत्साहित केले गेले.

सुरुवातीला परतावा दिलाआरोपींनी गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवण्यासाठी सुरुवातीला त्यांना परतावा दिला, परंतु 2017 मध्ये गुंतवणूकदारांची संख्या कमी झाल्यानंतर ही योजना फ्लॉप झाली आणि आरोपींनी गुंतवणूकदारांचे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांचे पैसे इन-हाऊस MCAP क्रिप्टोकरन्सीमध्ये बदलले, ज्याचे मूल्य वास्तविक मूल्यापेक्षा खूपच कमी होते.

देशभरात एफआयआर या क्रिप्टोकरन्सीच्या फसवणुकीत, फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा आरोप करत भारतभरात अनेक एफआयआर नोंदवण्यात आले. या घोटाळ्याचा आकार लक्षात घेता जम्मू-काश्मीर, पंजाब, चंदीगड, दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये नोंदवलेली प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे वर्ग केली होती. आता याप्रकरणी सीबीआयने कारवाई सुरू केली आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागCryptocurrencyक्रिप्टोकरन्सीcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी