छोटा राजनच्या वृत्ताला सीबीआयचा दुजोरा
By Admin | Updated: October 26, 2015 17:10 IST2015-10-26T17:09:33+5:302015-10-26T17:10:38+5:30
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे याला इंडोनेशियातील बालीमध्ये अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला सीबीआयने दुजोरा दिला आहे.

छोटा राजनच्या वृत्ताला सीबीआयचा दुजोरा
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २६ - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे याला इंडोनेशियातील बालीमध्ये अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला सीबीआयने दुजोरा दिला आहे.
सिडनीमधून बालीला आल्यानंतर ५५ वर्षांच्या एका व्यक्तिला रविवारी येथील पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे इंटरपोलच्या हवाल्याने कळविण्यात आले होते. त्यांनतर त्यांची अधिक चौकशीनंतर ही व्यक्ती छोटा राजन असल्याचे स्पष्ट झाले असून त्याला सीबीआयच्या ताब्यात देण्याची मागणी इंटरपोलकडे करणार असल्याची माहिती सीबीआय संचालक अनिल सिन्हा यांनी दिली आहे. इंडोनेशियातील बालीमध्ये छोटा राजन याला येथील पोलिसांना अटक केल्याचे प्राथमिक वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले होते. दरम्यान, भारताने छोटा राजनसाठी इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस बजावली असल्याने त्याला भारतात पाठवण्यात येईल अशी शक्यता आहे. तसेच, छोटा राजनची पूर्णपणे चौकशी झाल्यानंतरच त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले.