शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भूदानानंतरच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा; धनदांडग्यांना दिल्या जमिनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 03:07 IST

वर्धा जिल्ह्यामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी भूदानाच्या माध्यमातून जमविलेली १९८० हेक्टर जमीन होती. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही.

नवी दिल्ली : वर्धा जिल्ह्यामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी भूदानाच्या माध्यमातून जमविलेली १९८० हेक्टर जमीन होती. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही. परंतु अलीकडे या जमीनीचे वाटप भूमिहीन व लोकाभिमुख उपक्रमाला न देता धनदांडग्यांना व शिक्षण संस्थांना वितरित केली आहे. याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आज वर्ध्याचे रामदास तडस (भाजपा) यांनी लोकसभेत शून्य प्रहरात लावून धरली.रामदार तडस म्हणाले, की अधिकारी, भूमाफिया व शैक्षणिक संस्थांनी संगनमताने या जमिनी श्रीमंत, बिल्डर व संस्थांना विकल्या आहेत. विनोबांनी भूदान चळवळीचा प्रारंभ वर्धा सेवाग्राममधून ७ मार्च १९५१ ला व आंध्रातील शिवरामपल्ली म्हणजे आजच्या तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्लीमधून केला. त्यांनी श्रीमंतांना जमिनीचा काही भाग भूमिहीनांना देण्याचे आवाहन केले.आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, ओडिशा व महाराष्ट्र या राज्यांत ते पायी फिरले. त्यांना प्रचंड, सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परंतु सरकारी अधिकारी, भूमाफिया व शैक्षणिक संस्था यांनी भ्रष्टाचार करून स्वत:च्या फायद्याकरिता जमिनीचा उपयोग केला. त्यामुळे भूदानातून मिळालेल्या जमिनीच्या वाटपातील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करण्यात यावी.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग