शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

सीबीआयची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल; ९१व्या इंटरपोल जागतिक परिषदेच्या यजमानपदाचा मान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 05:39 IST

जागतिक पातळीवरील मोहिमांचे नेतृत्व पहिल्यांदाच सीबीआय करत आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: सीबीआयने जगातील पोलीस यंत्रणांच्या नेतृत्वाकडे वाटचाल सुरू केली आहे. जागतिक पातळीवरील मोहिमांचे नेतृत्व पहिल्यांदाच सीबीआय करत आहे. आता १८ ते २२ ऑक्टोबर २०२२ दरम्यान दिल्ली येथे इंटरपोलच्या ९१ व्या जागतिक महासभेचे आयोजनही सीबीआय करत आहे. 

भारतात १९९७ नंतर २५ वर्षांनी होणाऱ्या परिषदेत १९५ देशांचे पोलीस प्रमुख सहभागी होतील. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआय संचालक सुबोधकुमार जायस्वाल इंटरपोलमध्ये भारताचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात परिषद यशस्वी करण्यासाठी अनेक समित्या कार्यरत झाल्या आहेत. 

३० ऑगस्ट २०१९ रोजी इंटरपोलचे सरचिटणीस श्रीयुर्गन स्टॉक (लियॉन, फ्रान्स) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली होती.  या भेटीत शहा यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात २०२२ मध्ये इंटरपोल महासभा भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला.  सँटियागो (चिली) येथे इंटरपोलच्या महासभेत भारताच्या या प्रस्तावाला  प्रचंड बहुमत मिळाले. प्रगती मैदान येथे ही परिषद होणार आहे. 

सीबीआयच्या नेतृत्वात जागतिक कारवाई

चाइल्ड पोर्नोग्राफीविरुद्ध ऑपरेशन मेघचक्रमध्ये, सिंगापूर आणि न्यूझीलंडच्या इंटरपोल युनिट्सच्या इनपूटवर २१  राज्यांमध्ये ५९ ठिकाणी छापे मारले. अवैध ड्रग्ज पेलर्सविरुद्ध ऑपरेशन गरुडमध्ये ६ हजार ६०० जणांची तपासणी करून १७५ जणांवर १२७ गुन्हे दाखल केले. सायबर आर्थिक गुन्ह्यांविरुद्ध ऑपरेशन चक्रमध्ये एफबीआय, कॅनेडियन आणि ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या समन्वयाने जगभरात ११५ ठिकाणांची झडती घेण्यात आली. भारतातील १६ राज्यांत ८७ ठिकाणी शोधमोहीम घेण्यात आली. इंटरपोलच्या हेरॉईनविरुद्ध ऑपरेशन लायन फिशमध्ये सीबीआयने सर्वाधिक ७५.३ किलो हेरॉईन जप्त केले.

१९२३ मध्ये इंटरपोल स्थापन 

भारत १९४९ पासून सदस्यसध्या १९५ देश सदस्यइंटरपोलमध्ये १७ डेटाबेस. ज्यात ९० दशलक्ष रेकॉर्ड्स.इंटरपोल पोलिसांना त्यांचे कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक साधने पुरवते. इंटरपोल आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण आयोजित करते. तसेच तपासात सहभागी होते.इंटरपोलचे स्वतःचे सुरक्षित इंटरनेट चॅनेल आहे. हे सदस्य देशांना उपलब्ध करून दिले जाते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Central Bureau of Investigationकेंद्रीय गुन्हे अन्वेषणCBIगुन्हा अन्वेषण विभाग