शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

CBI Investigation: 30,912 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची 221 प्रकरणे, CBI ला अद्याप तपासाची परवानगी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 19:33 IST

CBI Investigation: महाराष्ट्रात सर्वाधिक 29040.18 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची एकूण 168 प्रकरणे आहेत. अद्याप सीबीआयला तपासाची परवानगी मिळाली नाही.

CBI Investigation In Corruption Cases:भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार अशाप्रकारच्या आर्थिक गुन्ह्यांच्या तपासासाठी केंद्रातील विविध एजन्सी काम करत असतात. सीबीआयदेखील अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा छडा लावत असते. पण, सीबीआयच्या तपासाबाबत केंद्र सरकारने एक मोठी माहिती दिली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोला 30,912.28 कोटी रुपयांच्या एकूण 221 भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विविध राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी मिळाली नाही. 

कार्मिक विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, CBI ला 20 जून 2022 पर्यंत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 17A अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील 235 कर्मचार्‍यांच्या विरोधात 101 प्रकरणांमध्ये तपास सुरू करायचा आहे. पण, अद्याप मंत्रालयांकडून मंजुरी मिळालेली नाही. यामध्ये जवळपास अशी 40 प्रकरणे आहेत, ज्यात सीबीआय तपास सुरू करण्यासाठी वर्षभरापासून वाट पाहत आहे, परंतु राज्य सरकारची मंजुरी अद्याप मिळालेली नाही.

राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी प्रश्न विचारला की, भ्रष्टाचाराची अशी किती प्रकरणे आहेत, ज्यात सीबीआयला तपास सुरू करण्यास राज्य सरकारची मंजुरी मिळालेली नाही. या प्रश्नाचे उत्तर देताना जितेंद्र सिंह यांनी अशा राज्यांची नावे क्रमवार दिली आणि सीबीआयला किती रक्कम तपासायची आहे हेदेखील सांगितले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचारमहाराष्ट्रात 29040.18 कोटी रुपयांची एकूण 168 भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत, ज्यासाठी सीबीआय राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करत आहे. यानंतर पश्चिम बंगालमध्ये 1193.80 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित एकूण 27 प्रकरणे आहेत, ज्यासाठी सीबीआय राज्याच्या ममता सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पंजाबमध्ये 255.32 कोटी रुपयांची 9 प्रकरणे, छत्तीसगडमध्ये 80.35 कोटी रुपयांची 7 प्रकरणे, झारखंडमध्ये 330.57 कोटी रुपयांची 6 प्रकरणे आणि राजस्थानमध्ये 12.06 कोटी रुपयांच्या 5 प्रकरणांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये सीबीआयला राज्य सरकारची परवानगी मिळालेली नाही. विशेष म्हणजे, या सर्व राज्यांमध्ये बिगर एनडीए पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रात गेल्या महिन्यातच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागMaharashtraमहाराष्ट्रCorruptionभ्रष्टाचार