CBI ही एक स्वतंत्र संघटना - व्यंकय्या नायडू
By Admin | Updated: December 15, 2015 18:43 IST2015-12-15T18:15:36+5:302015-12-15T18:43:00+5:30
सीबीआय केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत नाही, सीबीआय ही एक स्वतंत्र संघटना आहे, ते दिवस गेले जेव्हा काँग्रेसकडून सीबीआयचा गैरवापर व्हायचा,

CBI ही एक स्वतंत्र संघटना - व्यंकय्या नायडू
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - सीबीआय केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत नाही, सीबीआय ही एक स्वतंत्र संघटना आहे, ते दिवस गेले जेव्हा काँग्रेसकडून सीबीआयचा गैरवापर व्हायचा, दिल्लीचे मुख्यमंत्री केंद्राबरोबर वाद घालतात आणि मोदींना जबाबदार धरतात ही एक फॅशनच झाली आहे असे मत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापा टाकल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्र्यानी ट्विटरवर अप्रत्यक्षपणे सीबीआयच्या या कारवाईमागे मोदींचा हात आहे, ते भित्रे आहेत राजकीय पटलावर ते माझा सामना करु शकत नाहीत म्हणून काँग्रेसप्रमाणे CBIचा वापर करत असल्याचा आरोप केला होता, त्यानंतर भाजपाकडून केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी माध्यमांसमोर आपले मत आणि CBI ची भुमिका स्पष्ट केली.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या कार्यालयावर टाकण्यात आलेला सीबीआयच्या छाप्यावर उत्तर देतान सीबीआयने म्हटले आहे की, केजरीवाल केवळ खोटा प्रचार करत असून हे छापे केवळ दिल्लीतील सचिवालयात नव्हे तर युपीसहीत अन्य राज्यातील १४ ठिकाणांवर करण्यात आली आहे. सीबाआयला मिळालेल्या सर्च वॉरंटनंतरच ही कारवाई करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.