शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली फोगाट यांना PAनंच विष पाजलं, सीबीआयच्या आरोपत्रातून मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 15:00 IST

हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट हत्येप्रकरणी सीबीआयने गोवा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट हत्येप्रकरणी सीबीआयने गोवा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. सोनाली यांचा गोव्यातील कर्लीज बारमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. सोनाली यांचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्यावर जबरदस्तीने ड्रग्ज देऊन त्यांची हत्या केल्याचा आरोप होता. सोनाली यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने सोनाली फोगाट यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्याविरोधात गोवा कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. यापूर्वी गोवा पोलीस सोनालीच्या हत्येचा तपास करत होते. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. ऑगस्ट महिन्यात हे प्रकरण घडलं होतं. सोनाली यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्यावर हत्येचा आरोप केला.

फोगाट कुटुंबीयांनी केलेली सीबीआय चौकशीची मागणीसोनाली फोगटच्या कुटुंबीयांनी पीए सुधीर सांगवान आणि मित्र सुखविंदर यांच्यावर फोगाट यांना विष देऊन मारल्याचा आरोप केला होता. यासोबतच गोवा पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याचेही आरोप केला. सोनाली फोगटचा पुतण्या विकास सिंघमार यानं गोवा पोलिसांच्या तपासावर विश्वास नसल्याचं म्हटलं होतं. त्यांच्यावर एकप्रकारे राजकीय दबाव आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे. कुटुंबासोबतच हरियाणा सरकारनेही सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यानंतर गोवा सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

सीबीआयनं केली सुधीर आणि सुखविंदर यांची चौकशीसीबीआयने सोनाली फोगटचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांची कोलवाले कारागृहात चौकशी केली होती. सीबीआयने तपासादरम्यान गोवा पोलिसांनी तयार केलेल्या ५०० हून अधिक पानांच्या कागदपत्रांची तपासणी केली होती. इतकेच नाही तर CBI ने सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यासोबत कर्लीज बारमध्ये सीन रिक्रिएट देखील केला.

गोव्यापासून हरियाणापर्यंत तपाससुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यावर या कर्लीज बारमध्ये सोनाली फोगटला ड्रग्ज दिल्याचा आरोप आहे. गोवा पोलीस आणि सीबीआय या दोघांनी या प्रकरणाचा गोव्यापासून हरियाणातील हिस्सार, रोहतक आणि गुरुग्रामपर्यंत तपास केला होता. या संपूर्ण तपासानंतर सीबीआयनं न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे.

टॅग्स :Sonali Phogatसोनाली फोगाट