शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज चालणार नाहीत!; CBI अधिकाऱ्यांसाठी नव्या संचालकांनी आणली नवी नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 14:55 IST

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांना आता ड्युटीवर येताना जीन्स, टी-शर्ट आणि स्पोटर्स शूज घालता येणार नाहीत.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांना आता ड्युटीवर येताना जीन्स, टी-शर्ट आणि स्पोटर्स शूज घालता येणार नाहीत. सीबीआयचे नवनिर्वाचित संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गणवेशाच्या नियमावलीत महत्वाचे बदल केले आहेत. सीबीआयमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ड्युटवर येताना फॉर्मल कपडे परिधान करावेत, आता कार्यालयात जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज चालणार नाहीत, असे आदेश सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिले आहेत. 

सुबोधकुमार जयस्वाल यांनी मंजुरी दिलेलं एक परिपत्रक सहाय्यक संचालक(प्रशासन विभाग) अनूप टी मॅथ्यू यांनी जारी केलं आहे. सीबीआयच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज किंवा चप्पल घालून कार्यालयात येता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. सीबीआयमधील पुरूष अधिकाऱ्यांना फॉर्मल शर्ट-पँट आणि फॉर्मल शूज घालणं बंधनकारक असणार आहे. त्यासोबतच अधिकाऱ्यांना दाढी देखील वाढवता येणार नाही. तर महिला अधिकारी आणि कमचाऱ्यांना ड्युटीवर येताना केवळ साडी किंवा फॉर्मल शर्ट परिधान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

सुबोधकुमार आणखी काही बदल करण्याच्या तयारीत१९८५ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या सुबोधकुमार जयस्वाल यांनी सीबीआयचे 33 वे संचालक म्हणून पदभार हाती घेतला आहे. त्यांना दोन वर्षांसाठी सीबीआयच्या संचालकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. ऋषी कुमार शुक्ला यांचा कार्यकाळ ३ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आल्यानंतर सुबोधकुमार यांना सीबीआयचं संचालक करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तीन सदस्यीय निवड समितीनं सुबोधकुमार जयस्वाल यांच्या नावाला मंजुरी दिली होती. आगामी काळात सीबीआयमध्ये आणखी काही महत्वपूर्ण बदल करण्याचा सुबोधकुमार यांचा मानस असल्याचं सांगितलं जात हे.  

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागPoliceपोलिस