शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

सीबीआय तोंडघशी : पालक निर्दोष, आरुषीची हत्या मग केली तरी कोणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:47 IST

पुरावे देण्यात सीबीआयला अपयश आल्याने आरुषी हत्या प्रकरणातून अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिचे वडील डॉ. राजेश तलवार व आई नुपूर यांची पुराव्याअभावी सुटका केली.

अलाहाबाद : पुरावे देण्यात सीबीआयला अपयश आल्याने आरुषी हत्या प्रकरणातून अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिचे वडील डॉ. राजेश तलवार व आई नुपूर यांची पुराव्याअभावी सुटका केली. आरुषी व घरातील नोकर यांचे मृतदेह १६ मे २00८ रोजी घरात आढळले होते. पालकांची सुटका झाल्याने आरुषी व नोकर हेमराज यांची हत्या कोणी केली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.दोघांच्या हत्येप्रकरणी गाझियाबाद सीबीआय न्यायालयाने राजेश व नुपूर यांना २६ आॅक्टोबर २0१३ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून हे दाम्पत्य गाझियाबादच्या दासना तुरुंगात होते. उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे त्यांची शुक्रवारी सुटका होईल, अशी अपेक्षा आहे.आरुषीचा मृतदेह १६ मे २00८ रोजी नॉयडातील घरात आढळला होता. तिची हत्या हेमराजने केल्याचा संशय घेतला गेला. पण दुसºया दिवशी घराच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह सापडल्याने तलवार दाम्पत्याकडे संशयाने पाहिले गेले. त्यांना अटकही करण्यात आली. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. आता या निकालानंतर सीबीआयने आदेशाचा अभ्यास करून पुढे काय करायचे ठरवणार असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)आरुषीची हत्या झाली, तेव्हा ती अवघी १४ वर्षांची होती. तिचे व हेमराजचे संबंध होते, या संशयातून त्या दोघांची हत्या करण्यात आली आणि ती तलवार दाम्पत्यानेच केली, असे सांगण्यात येत होते. आता तलवार दाम्पत्याची निर्दोष सुटका झाल्यामुळे या हत्या कोणी केल्या, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. परिणामी या हत्येचे रहस्य कायमच आहे.सीबीआय तपासाचा गोंधळ-गाझियाबाद पोलिसांनी तपास नीट न केल्याची आणि त्यामुळे घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे नष्ट झाल्याची टीका झाल्यानंतर त्या वेळच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी महिनाभरातच या खुनांचा तपास सीबीआयकडे सोपविला होता. सीबीआयनेही तपासात गोंधळ घातला.तपास करणाºया पहिल्या तुकडीने ‘लाय डिटेक्टर’ आणि ‘नाकोॅ’ चाचण्यांनंतर तलवार दाम्पत्यासह त्यांच्या कम्पाउंडरला व इतर दोघांना अटक केली. परंतु नंतर या तपासी पथकाने अटक केलेल्या कोणाहीविरुद्ध पुरावा नसल्याचा अहवाल दिला. परंतु विशेष न्यायालयाने तो फेटाळला व आणखी तपास करण्याचा आदेश दिला.दुसरे तपासी पथक नेमून पुन्हा तपास केला गेला. या पथकानेही तलवार दाम्पत्याविरुद्धचा पुरावा साशंक असल्याचे म्हटले. परंतु न्यायालयाने आहे त्या पुराव्यावर आरोपपत्र दाखल करण्यास सांगितले.घटनेवर चित्रपट : हा खटला केवळ दिल्ली आणि परिसरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशात त्याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. या लोकभावना लक्षात घेऊनच या घटनाक्रमावर ‘तलवार’ नावाचा चित्रपट काढला गेला. मेघना गुलजार यांनी तो दिग्दर्शित केला होता.आनंदाश्रूआणि प्रार्थनानिकाल जाहीर करताच डॉ. राजेश तलवार यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले व त्यांनी आनंदाने सोबत आलेल्या तुरुंग कर्मचाºयांना मिठी मारली. त्यांची पत्नी डॉ. नुपूर यांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या नाहीत. मात्र निकाल वाचला जाताना त्या हात जोडून प्रार्थना करत होत्या. या दोघांनी न्याय मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केल्याचे तुरुंग अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Aarushi murderआरुषी हत्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय