शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

CBI Busts Racket: '100 कोटींमध्ये राज्यपाल-राज्यसभेची जागा घ्या', CBIकडून टोळीचा भांडाफोड, 4 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:41 IST

राज्यसभेची उमेदवारी आणि राज्यपालपद मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन 100 कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या आंतरराज्य टोळीचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पर्दाफाश केला आहे. यात लातूरच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

CBI Busts Racket: राज्यसभेची उमेदवारी आणि राज्यपालपद मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन 100 कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या आंतरराज्य टोळीचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तपास यंत्रणेने अनेक ठिकाणी छापे टाकून टोळीतील चार जणांना अटक केली आहे. एक आरोपी सीबीआय अधिकाऱ्यांवर हल्ला करून पळून जाण्यात यशस्वी झाला. तपास संस्थेच्या अधिकार्‍यांवर हल्ला केल्याप्रकरणी फरार आरोपींविरुद्ध स्थानिक पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीबीआयने एफआयआरमध्ये महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी कमलाकर प्रेमकुमार बंडगर, कर्नाटकच्या बेळगावचा रहिवासी रवींद्र विठ्ठल नाईक आणि दिल्लीचे रहिवासी महेंद्र पाल अरोरा, अभिषेक बुरा आणि मोहम्मद एजाज खान यांची नावे आहेत. एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, बंडगर हा सीबीआयचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगायचे आणि बुरा, अरोरा, खान आणि नाईक यांना लोकांची फसवणूक करुन मोठी कामे आणायला सांगायचा. 

एफआयआरमध्ये काय आहे?एफआयआरनुसार, राज्यसभेत जागा मिळवून देणे, राज्यपालपदी नियुक्ती करणे, केंद्र सरकारच्या मंत्रालयांतर्गत विविध सरकारी संस्थांचे अध्यक्षपद मिळवून देणे, अशी खोटी आश्वासन देऊन ही टोळी सामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळायची. 100 कोटी रुपयांच्या बदल्यात राज्यसभेची उमेदवारी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक करण्यात आली. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागMember of parliamentखासदार