शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

गोंधळी खासदारांचे वेतन कापा - मनोज तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:12 IST

गदारोळामुळे सलग १३ दिवस संसदेत कसलेही कामकाज न झाल्याने, भाजपाचे सदस्य मनोज तिवारी यांनी, गोंधळ घालणाऱ्या खासदारांना शिक्षा म्हणून त्यांचे वेतन कापून घेण्यात यावे, असे पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिले आहे.

नवी दिल्ली : गदारोळामुळे सलग १३ दिवस संसदेत कसलेही कामकाज न झाल्याने, भाजपाचे सदस्य मनोज तिवारी यांनी, गोंधळ घालणाऱ्या खासदारांना शिक्षा म्हणून त्यांचे वेतन कापून घेण्यात यावे, असे पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिले आहे. याची तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) खासदाराने ‘चोराच्या उलट्या बोंबा’असे म्हणत खिल्ली उडविली आहे.खा. मनोज तिवारी यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, लोकप्रतिनिधींचे वर्तन पाहून मला दु:ख होत आहे. कायदे तयार करण्याची जबाबदारी असणारेच यापासून पळ काढत आहेत. संसदेत कोणतेही भरीव काम न करणाºया खासदारांचे ‘काम नाही तर वेतन नाही’ या तत्वाने मानधन कापले जावे.टीआरएसच्या खासदार के. कविता यांनी मात्र या मागणीची खिल्ली उडविली आहे. कविता म्हणाल्या की, सरकारने नीट काम केल्यास खासदारांना निदर्शनाची वेळ येणार नाही. हे पत्र म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ असा प्रकार आहे. मागण्यांवर तोडगा काढल्यास कुणीही सभागृहात निदर्शने करणार नाही.टीआरएसच्या भूमिकेबाबत संशयटीआरएसच्या या भूमिकेमुळे आता संशय निर्माण झाला आहे. मोदी सरकारविरोधात तेलगू देसम व व्हायएसआर काँग्रेसने आणणलेल्या अविश्वास ठरावावेळी टीआरएसने तटस्थ राहत सरकारला छुपा पाठिंब्याचे संकेत दिले होते. अविश्वास ठराव दाखल करण्यात आला, तेव्हाही टीआरएसच्या खासदारांनी तेलंगणामध्ये जादा आरक्षणाच्या मागणीसाठी गोंधळ घातला होता. ठराव दाखल होताच अण्णा द्रमुकनेही कामकाज बंद पाडण्यात पुढाकार घेतला. ठरावाला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व डाव्यांनी पाठिंबा दिला आहे. टीआरएस व अण्णा द्रमुक हे सरकारच्या इशाºयावरूनच गोंधळ घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

टॅग्स :Manoj Bajpayeeमनोज वाजपेयी