शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

भारतात सातत्याने येणाऱ्या वादळ, पूर आणि ढगफुटीसारख्या घटनांचे कारण आले समोर, जाणकार सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 17:26 IST

Climate Change: आधी वाटायचं की, हवामान बदलाचा परिणाम आपल्याला 50 ते 90 वर्षानंतर दिसेल. पण, आता हा 10-30 वर्षातच दिसण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: मागच्या काही काळात भारतीय उपखंडातील संपूर्ण परिसर म्हणजेच भारत, बांगलादेश ते नेपाळ, दक्षिण चीन आणि अफगाणिस्तानपर्यंतचे क्षेत्र सातत्याने वादळ, पूर आणि ढगफुटींसारख्या आपत्तींना तोंड देत आहे. येत्या काळात अशा घटनांमध्ये तीव्रतेने वाढ होणार असल्याची माहिती ग्लेशियोलॉजिस्ट पॉल मायेव्स्की यांनी दिली आहे.

पॉल यांनी सांगितल्यानुसार, आर्कटिक, अंटार्कटिक आणि एव्हरेस्टचा बर्फ वितळत असल्यामुळे अशा घटना वाढल्या आहेत. पॉल जगातील एकमेव ग्लेशियोलॉजिस्ट आहेत, ज्यांनी तिन्ही क्षेत्रांच्या वातावरण बदलाचा अभ्यास केला आहे. ते जगातील सर्वात जुन्या क्लायमेट चेंज इंस्टीट्यूट, यूनिव्हर्सिटी ऑफ मेनच संचालकदेखील आहेत. दैनिक भास्करला त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बरीच माहिती दिली आहे.

भारतीय उपखंडात पूर-दुष्काळ वाढण्याचे कारण ?भारतात दक्षिण आणि पश्चिम भागात आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहेत. परंतु काही वर्षांपासून आर्क्टिक ध्रुवावरुनही भारतामध्ये ओलावा पोहोचत आहे. याचे कारण म्हणजे आर्क्टिक, अंटार्क्टिक आणि हिमालयातील हिमनद्या हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित होत आहेत. जगातील तापमान वाढ 1.5 अंश असताना, या क्षेत्रांमधील तापमानवाढ 4 अंशांपर्यंत गेली आहे. दरम्यान, बर्फ वेगाने वितळत असल्यामुळे त्याच्या ओलाव्यासह वारे हिमालयाच्या उत्तर आणि दक्षिण दिशेने वेगाने वाहत आहेत.

जेव्हा हे थंड वारे सखल भागातील उबदार वाऱ्यांसोबत मिसळतात, तेव्हा वादळ तयार होते. त्यामुळेच भारतात मागील अनेक दिवसांपासून वादळी पाऊस आणि पूर येण्याच्या घटना वाढल्या आहेत. हा बर्फ वितळण्यासह, जंगल कमी झाल्यमुळे पाऊस जमीनीत मुरण्याऐवजी मातीला घेऊन नद्यांसोबत मिसळत आहे. त्यामुळेच एखाद्या ठिकाणी थोडा पाऊस झाला तरी पूर परिस्थिती तयार होत आहे आणि पाऊस थांबताच नद्यांमधील प्रवाह पूर्णपणे थांबून नदी कोरडी पडतीये.

परिस्थिती किती वेगाने बदलतीये ?90 च्या दशकात आपल्याला वाटायचं की, हवामान बदलाचा परिणाम आपल्याला 50 ते 90 वर्षानंतर दिसेल. पण, आता हा 10-30 वर्षातच दिसण्याची शक्यता आहे. तुम्हीही वृत्तपत्रात वाचत असाल किंवा टीव्हीवर पाहत असाल, मागच्या काही दिवसात ढगफुटीच्या घटना चांगल्याच वाढल्या आहेत. ढगफुटी होणे म्हणजे वातावरणातील आद्रता वाढून प्रचंड पाऊस पडणे. जगातील तापमान वाढीमुळे अनेक ठिकाणी या घटना घडत आहेत. यामळे मोठ्या आर्थिक नुकसानीसह जीवितहानी देखील होत आहे.

दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार ?

बर्फाळ प्रदेशातील बर्फ एखाद्या स्पंजप्रमाणे प्रदूषण शोषून घेत असतो. पण, बर्फ वितळत असल्यामुळे प्रदुषण वाढत आहे. याशिवाय, बर्फ वितळल्यामुळे यातील जमा असलेले दुषित प्रदुषण नद्यांमध्ये जमा होऊन नद्यांनाही दुषित करतोय. याचा आपल्यावरही परिणाम होतोय. तसचे, आजकाल बर्फाचा रंगही राखाडी होऊ लागला आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णता नष्ट करण्याऐवजी आता बर्फातच बरीच उष्णता साचून राहतीये. 

हवामान बदलाचे सर्वात वाईट स्वरूप कोणते असेल?

जगातील लाखो टन मिथेन वायू बर्फाखाली जमा आहे. जर पर्माफ्रॉस्ट नावाचा बर्फाचा थर वितळवून मिथेन वातावरणात आला तर ते वातावरणाची उष्णता 30 ते 50 पट वाढवू शकतो. वाढत्या उष्णतेमुळे जगातील बर्फाचे आवरण वितळून समुद्राची पातळी 70 मीटरपर्यंत वाढू शकते. यामुळे समुद्राजवळ राहणाऱ्यांना पाण्याचा आणि जे समुद्राच्या जवळ राहत नाहीत त्यांना तीव्र दुष्काळ, जंगलातील आग आणि धुळीच्या वादळांना सामोरे जावे लागेल.

टॅग्स :floodपूरRainपाऊसIndiaभारत