अपार्टमेंटमध्ये संशयास्पद घुसलेल्या तरुणाला पकडले
By Admin | Updated: March 14, 2016 00:21 IST2016-03-14T00:21:08+5:302016-03-14T00:21:08+5:30
जळगाव: वाघुळदे नगरातील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये संशयास्पद घुसलेल्या ओमप्रकाश रावत (वय ३३ रा.ब्यावर, जि.अजमेर, राजस्थान) या तरुणाला रविवारी संध्याकाळी आठ वाजता रहिवाशांनी पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. रावत हा प्रथमेश अपार्टमेंटमध्ये तिसर्या मजल्यावर संशयास्पद उभा असल्याचे संतोष चौधरी यांच्या पत्नीच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच ही माहिती पती व अन्य रहिवाशांना दिली. राजेंद्र पाटील, देवेंद्र पाटील यांनी शहर पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून रावतला ताब्यात घेतले. दरम्यान, रावत हा ब्यावर येथून उडीसा येथे जात होता, नाश्त्यासाठी जळगाव रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर काही वेळात गाडी पुढे रवाना झाली. त्यामुळे तो स्टेशनवरच राहिला, असे त्याचा भाऊ रुपा गवळी (रावत) याने पोलिसांना सांगितले.

अपार्टमेंटमध्ये संशयास्पद घुसलेल्या तरुणाला पकडले
ज गाव: वाघुळदे नगरातील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये संशयास्पद घुसलेल्या ओमप्रकाश रावत (वय ३३ रा.ब्यावर, जि.अजमेर, राजस्थान) या तरुणाला रविवारी संध्याकाळी आठ वाजता रहिवाशांनी पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. रावत हा प्रथमेश अपार्टमेंटमध्ये तिसर्या मजल्यावर संशयास्पद उभा असल्याचे संतोष चौधरी यांच्या पत्नीच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच ही माहिती पती व अन्य रहिवाशांना दिली. राजेंद्र पाटील, देवेंद्र पाटील यांनी शहर पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून रावतला ताब्यात घेतले. दरम्यान, रावत हा ब्यावर येथून उडीसा येथे जात होता, नाश्त्यासाठी जळगाव रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर काही वेळात गाडी पुढे रवाना झाली. त्यामुळे तो स्टेशनवरच राहिला, असे त्याचा भाऊ रुपा गवळी (रावत) याने पोलिसांना सांगितले.