IRCTC: रेल्वेत खानपान व इतर सेवा बंद, भाडे मात्र जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 08:24 AM2021-08-28T08:24:59+5:302021-08-28T08:26:52+5:30

जनतेची नाराजी : सवलत बंद केल्याने ज्येष्ठ नागरिकही त्रस्त. भारतात काेराेनाचा रुग्ण आढळल्यानंतर २० मार्च २०२० पासून संपूर्ण प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली हाेती.

Catering and other services are closed on the railways, but fares are higher pdc | IRCTC: रेल्वेत खानपान व इतर सेवा बंद, भाडे मात्र जास्त

IRCTC: रेल्वेत खानपान व इतर सेवा बंद, भाडे मात्र जास्त

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काेराेना महामारीमुळे सध्या मर्यादित प्रवासी रेल्वे सुरू आहेत. मात्र, त्यात मिळणाऱ्या सुविधा आणि वाढीव प्रवास भाड्यामुळे प्रवासी वैतागले आहेत. त्यातही प्रवासभाड्यात ज्येष्ठांना काेणतीही सवलत न दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची रेल्वेवर प्रचंड नाराजी आहे. रेल्वेने काही गाड्यांमध्ये खानपान सेवा बंद केली तसेच सुपरफास्ट गाड्यांचे दर आकारण्यात येतात. मात्र, गाडी प्रत्येक स्थानकावर थांबते. या प्रकारामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.

भारतात काेराेनाचा रुग्ण आढळल्यानंतर २० मार्च २०२० पासून संपूर्ण प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली हाेती. त्यानंतर मजुरांना घरी परतता यावे म्हणून विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. हळूहळू टप्प्याटप्प्याने मर्यादित स्वरुपात प्रवासी रेल्वे गाड्यांना परवानगी देण्यात आली. मात्र, या गाड्यांमध्ये काही सुविधा बंद करण्यात आल्या. काेराेनाचे कारण सांगून खानपान सेवा, एसी डब्यांमध्ये ब्लॅंकेट आणि उशी पुरविणे बंद करण्यात आले. पाकीटबंद अन्न पुरविण्यात येते. मात्र, त्याचा दर्जा अतिशय खराब असताे. या गाड्यांसाठी तिकीटदरदेखील जास्त आकारण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रवासभाड्यातील सर्व सवलती रेल्वेने रद्द केल्या. त्यात ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलतही बंद झाली. गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्येष्ठांना वाढीव प्रवासभाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.

आणखी एक बाब म्हणजे, दाेन ठराविक स्थानकांमध्ये वेगवेगळ्या गाड्यांसाठी वेगवेगळे प्रवासभाडे आकारण्यात येत आहे. या गाड्या डायनामिक प्रायसिंग असलेल्या दुरंताे, राजधानी किंवा इतर श्रेणीच्या गाड्यांमध्ये नाहीत. तरीही जास्त भाडे आकारण्यात येत आहे. भाडे सुपरफास्ट गाड्यांचे घेतात. मात्र, गाडी सर्वच ठिकाणी थांबते. अशा प्रकारावरून रेल्वेवर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सवलत नाकारल्याने ज्येष्ठांची नाराजी
प्रवासभाड्यात यापूर्वीच्या काळात ज्येष्ठ नागरिक महिलांना ५०, तर पुरुषांना ४० टक्के सवलत मिळते. त्यामुळे बाहेरगावी तीर्थयात्रा किंवा नातेवाईकांकडे जाणाऱ्या ज्येष्ठांना फार माेठा आधार मिळत हाेता. मात्र, रेल्वेने ही सवलत बंद केल्यामुळे ज्येष्ठ नागरिक संतप्त झाले आहेत.

Web Title: Catering and other services are closed on the railways, but fares are higher pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.