शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:56 IST

Supreme Court: रस्त्यावरून फिरणारे भटके कुत्रे ही शहरी भागातील एक गंभीर समस्या बनलेले आहे. या भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर अनेक लहान मुलं भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत.

रस्त्यावरून फिरणारे भटके कुत्रे ही शहरी भागातील एक गंभीर समस्या बनलेले आहे. या भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर अनेक लहान मुलं भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे रात्री अपरात्री आणि अगदी दिवसाढवळ्याही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव असलेल्या भागातून लोकांना जीव मुठीत धरून जावं लागतं.  दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांविरोधात सक्त भूमिका घेतली आहे. तसेच रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना डॉग शेल्टर होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार, एमसीडी, एनडीएमसी, एनसीआरमधील प्रशासकीय यंत्रणांना शहरातील रस्ते आणि गल्लीबोळांना भटक्या कुत्र्यांच्या जाचापासून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्यात यावे आणि डॉग शेल्टर होममध्ये ठेवण्यात यावे, तसेच या संस्थांनी पुढच्या सहा आठवड्यांमध्ये ५ हजार कुत्र्यांना पकडून सुरुवात करावी,  असे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत.

दरम्यान, या कामाक कुठली व्यक्ती किंवा संस्थेने अडथळा आणला तर कोर्टाला सांगा, कोर्ट त्यांच्यावर कारवाई करेल, असा सक्त इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दिल्ली एनसीआरमधील सर्व प्राधिकरणांनी त्वरित डॉग शेल्टर होम बनवावेत. तसेच त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरबाबत आठ आठवड्यांमध्ये कोर्टात माहिती द्यावी, तिथे कुत्र्यांच्या नसबंदीसाठी पुरेशा लोकांची तैनाती करावी. या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी सोडू नये. तसेच त्यांच्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवावे, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी लहान मुलांचे चावे घेतल्याच्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच आपल्या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी ताकिदही कोर्टाने दिली आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdogकुत्रा