शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

जातनिहाय जनगणना केंद्र सरकारकडून अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 07:18 IST

शरद पवार यांची भाजपवर टीका, ओबीसी आरक्षण मार्गी लावूनच निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जो न्यायाचा अधिकार आहे, तो मिळायला हवा. यासाठी जातनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही. भाजपसोबत असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला. पण केंद्रातील हे सरकार असेपर्यंत हे होईल, असे मला वाटत नाही. कारण ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांची मानसिकताच वेगळी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर तोफ डागली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलची बुधवारी बैठक झाली. त्यावेळी पवार म्हणाले की, आज भाजपचे लोक काहीही बोलत असले तरी त्यांच्या मनातली मळमळ स्पष्ट दिसत आहे. जोपर्यंत एखादा समाज सन्मानाने उभा राहात नाही, तोपर्यंत सवलती देण्याची गरज आहे. ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती? असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. त्यामुळे एकदाची जातनिहाय जनगणना करूनच टाका, म्हणजे या देशाला नेमकी संख्या कळेल. मग त्या संख्येप्रमाणे न्यायाची वाटणी करा. इथे कुणी फुकट काही मागत नाही.

आरक्षणाचा विषय मार्गी लावूनच निवडणूकआगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लावूनच निवडणुकांना सामोरे जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादीने राज्य सरकारमध्ये घेतली आहे. ओबीसींना त्यांचे प्रतिनिधित्व देऊनच सत्तेचा कारभार चालवेल. तसेच हे फक्त महाराष्ट्रापुरते करून चालणार नाही, तर संपूर्ण देशात ओबीसींना न्याय देण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, असेही पवार म्हणाले.

फडणवीस, तुम्ही झोपला होता का?भाजपकडून ओबीसींना न्याय मिळण्याची शक्यता नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, महाविकास आघाडीने धोका दिला. पण पाच वर्षे केंद्र  व राज्यात सत्ता असताना तुम्ही झोपला होता का? आमच्यावर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही.     - शरद पवार

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारOBC Reservationओबीसी आरक्षणBJPभाजपा