हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे कॅसिनो कनेक्शन
By Admin | Updated: September 21, 2014 02:24 IST2014-09-21T02:24:14+5:302014-09-21T02:24:14+5:30
गोव्यातील उच्चभ्रू वतरुळात चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा थेट कॅसिनो डिलर्सशी संबंध असल्याचे स्पष्ट करणारे एक प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाने उघडकीस आणले आहे.

हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे कॅसिनो कनेक्शन
मडगाव : गोव्यातील उच्चभ्रू वतरुळात चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा थेट कॅसिनो डिलर्सशी संबंध असल्याचे स्पष्ट करणारे एक प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाने उघडकीस आणले आहे. डिलर्सना हाताशी धरून कॅसिनोवर खेळायला येणा:या पर्यटकांना हायप्रोफाईल वेश्या पुरविण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी नवी दिल्लीतील रॉबिन उर्फ रुबीकुमार या तरुणाला अटक करण्यात आली असून, कोलकात्यातील एका युवतीची सुटका केली आहे.
रघुवीरनगर-नवी दिल्ली येथील हा आरोपी पर्वरीतील एका हॉटेलात राहून व्यवसाय करत होता, हे उघडकीस आले आहे. कॅसिनोतील ग्राहकांना पुरविण्यासाठी या युवतीला खास विमानाने गोव्यात बोलावून घेतले होत़े या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, बारा दिवसांच्या पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अटक केलेल्या संशयिताच्या मोबाईलवर अनेक प्रतिष्ठित व्यक्तिंची नावे सापडली आहेत. त्यात काही कॅसिनो डिलर्सचाही समावेश आहे. दिल्लीत बसूनच हा सौदा केला जायचा व नंतर गोव्यात या युवतीना आणून त्यांना कॅसिनो ग्राहकांना पुरविले जायचे. (प्रतिनिधी)