कॅश फॉर व्होट; प्राथमिक आरोपपत्र

By Admin | Updated: July 29, 2015 01:55 IST2015-07-29T01:55:10+5:302015-07-29T01:55:10+5:30

तेलगू देसम पार्टीचे आमदार ए. रेवांथ रेड्डी यांचा कथित सहभाग असलेल्या कॅश फॉर व्होटप्रकरणी तेलंगणच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेने मंगळवारी येथील एका न्यायालयात प्राथमिक

Cash for Vote; Primary charge sheet | कॅश फॉर व्होट; प्राथमिक आरोपपत्र

कॅश फॉर व्होट; प्राथमिक आरोपपत्र

हैदराबाद : तेलगू देसम पार्टीचे आमदार ए. रेवांथ रेड्डी यांचा कथित सहभाग असलेल्या कॅश फॉर व्होटप्रकरणी तेलंगणच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेने मंगळवारी येथील एका न्यायालयात प्राथमिक आरोपपत्र दाखल केले.
रेवांथ रेड्डी यांच्यासह बिशप सेबस्टियन हॅरी, रेड्डी यांचा सहकारी उदय सिन्हा आणि एम. जेरुसलेम यांच्या विरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आमचा तपास सुरू आहे. लवकर आम्ही तेदेपा आमदार सांद्रा व्यंकटा व्यंकैय्या व अन्यविरुद्ध आणखी एक आरोपपत्र दाखल करणार आहोत, असे भ्रष्टाचारविरोधी शाखेचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. मल्ला रेड्डी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Cash for Vote; Primary charge sheet