एटीएममध्ये खेळण्यातल्या नोटा टाकणा-याला अटक
By Admin | Updated: February 24, 2017 16:27 IST2017-02-24T16:27:50+5:302017-02-24T16:27:50+5:30
नवी दिल्लीच्या एका एटीएममधून 6 फेब्रुवारीला खेळण्यातल्या नोटा निघाल्या होत्या. त्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका आरोपीला अटक

एटीएममध्ये खेळण्यातल्या नोटा टाकणा-याला अटक
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - नवी दिल्लीच्या एका एटीएममधून 6 फेब्रुवारीला खेळण्यातल्या नोटा निघाल्या होत्या. त्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मोहोम्मद ईशा असं आरोपीचं नाव आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी ब्रिंक्स आर्य प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कर्मचारी आहे. एटीएममध्ये रोकड टाकण्याची त्याची जबाबदारी होती. खेळण्याच्या नोटा त्याने एटीएममध्ये पहिल्यांदाच टाकल्या होत्या असं चौकशीतून समोर आल्याचं वृत्त आहे . असा प्रकार त्याने पुन्हा करण्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली.
अटक करून पोलिसांनी त्याला संगम विहार पोलीस स्थानकात आणलं त्यानंतर स्टेट बॅंकेचे अधिकारीही पोलीस स्थानकात पोहोचले. आरोपीविरोधात पोलिसांनी आयपीसी कलम 406, 409 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.