शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१५५१ कोटी रुपयांची रोकड, अमली पदार्थ जप्त, महाराष्ट्रात सर्वाधिक दारु हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 08:23 IST

निवडणूक आयोगाची कारवाई; सोन्याचांदीच्या वस्तूही हस्तगत, महाराष्ट्रात सर्वाधिक दारु हस्तगत

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने देशभरात आतापर्यंत बेहिशेबी रोकड, अवैध दारु, अंमली पदार्थ, सोने-चांदीच्या वस्तू असा सुमारे १५५१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक १९ लाख लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. या गोष्टींचा वापर मतदारांना आमिष दाखविण्यासाठी करण्यात येणार होता, असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने ३७७ कोटी रुपयांची रोकड, १५७ कोटी रुपये किमतीची दारू, ७०५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, ७८ लाख लिटर पेट्रोल, ३१२ कोटी रुपयांच्या सोने-चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.

मतदारांना पैसे किंवा अन्य भेटवस्तू देऊन आपल्या बाजूने वळविण्याचे राजकीय पक्षांचे प्रयत्न हाणून पाडण्याचे आयोगाने ठरविले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत अशा प्रकारच्या २९९.९४ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड निवडणूक आयोगाने जप्त केली होती. आतापर्यंत देशात तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त म्हणजे १२७.८४ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड निवडणूक आयोगाने जप्त केली आहे.२०१४च्या निवडणुकीत या राज्यातून फक्त १५.५६ कोटींची रोकड ताब्यात घेण्यात आली होती. मतदारांनी देण्यासाठीतयार केलेल्या सोने-चांदीच्या वस्तू तामिळनाडूमधूनच हस्तगत करण्यात आल्या आहेत.पंजाबमधून ११६ कोटींचे अमली पदार्थदेशात महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे १९ लाख लिटर अवैध दारु जप्त करण्यात आली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रातून ३१ हजार लीटर अवैध दारु ताब्यात घेण्यात आली होती. पंजाबमधून ११६ कोटींचे अंमली पदार्थ निवडणूक आयोगाने जप्त केले आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदीElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक