वडगाव अपघात प्रकरणी अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:08+5:302015-06-12T17:38:08+5:30
पुणे : सिंहगड रस्त्यावर वडगाव पुलावर ,मंगळवारी ( दि.11) रोजी झालेल्या अपघातात ८ निष्पापांचा बळी गेला. १ ऑक्टोबर २०१० पासून कात्रज देहूरोड मार्गावर ६ पदरीकरणाचे काम सुरु आहे. ३१ मार्च २०१३ ला संपणे अपेक्षित असलेल्या या कामाला झालेल्या २. ५ वर्षांच्या विलंबामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असून या दिरंगाईस जबाबदार असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांवर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सजग नागरिक मंचाने पोलीस आयुक्त के.के पाठक यांच्याकडे केली आहे. रस्त्यांच्या या कामाच्या दिरंगामुळे आज पर्यंत 150 जणांचे बळी गेले असल्याचेही वेलणकर यांनी मागणीत नमूद केले आहे.

वडगाव अपघात प्रकरणी अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
प णे : सिंहगड रस्त्यावर वडगाव पुलावर ,मंगळवारी ( दि.11) रोजी झालेल्या अपघातात ८ निष्पापांचा बळी गेला. १ ऑक्टोबर २०१० पासून कात्रज देहूरोड मार्गावर ६ पदरीकरणाचे काम सुरु आहे. ३१ मार्च २०१३ ला संपणे अपेक्षित असलेल्या या कामाला झालेल्या २. ५ वर्षांच्या विलंबामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असून या दिरंगाईस जबाबदार असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांवर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सजग नागरिक मंचाने पोलीस आयुक्त के.के पाठक यांच्याकडे केली आहे. रस्त्यांच्या या कामाच्या दिरंगामुळे आज पर्यंत 150 जणांचे बळी गेले असल्याचेही वेलणकर यांनी मागणीत नमूद केले आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू असताना, रिफ्लेक्टर नसने . या रस्त्यावर लेन माकिंर्ग न करणे, मजबूत कठडे नसणे, रस्ते दुभाजक जागोजागी पंक्चर असणे तसेच सर्व्हीस रस्त्याचे काम रखडणे या सर्व गोष्टींमुळे मनुष्य व वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या रस्त्यावर २० अपघात प्रवण जागा असल्याचे वाहतूक पोलिसांनी प्राधिकरणाच्या अधिका-यांना गेल्या दोन वर्षापासून वारंवार कळविण्यात येत आहे. मात्र. त्या मागणीनुसार, केवळ कंत्राटदाराला खलिते पाठविण्याशिवाय महामार्ग प्राधिकरणाने काही ही केले नाही. त्यामुळे प्राधिकरण व कंत्राटदार या दोघांच्या बेजाबदारपणा व दुर्लक्ष्यपणामुळेच प्राणघातक अपघातांची मालिका सुरु आहे.किमान आता तरी आपण जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांचेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे. तसेच वाहतूक नियंत्रण सोडून रस्त्याच्या कडेला फक्त असंघटीत दुचाकीस्वारांची 'शिकार' करणा-या आणी चारचाकी गाड्याच्या काळ्या काचांवर कारवाई करून पुरुषार्थ गाजविणा-्या परंतु 'अनधिकृत वाहतुकीकडे', 'अनधिकृत थांब्यांकडे', 'ओवरलोड' जड वाहनांकडे दुर्लक्ष्य करणा-्या वाहतूक पोलिसांवरही कारवाई करावी अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, विश्वास सहस्त्रबुध्दे यांनी केली आहे.===================================