आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 8, 2015 02:08 IST2015-09-08T02:08:47+5:302015-09-08T02:08:47+5:30
नाशिक : हुंड्यासाठी छळ केल्यामुळेच बहिणीने आत्महत्त्या केल्याची फिर्याद मयत विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर दशरथ वाघमारे (रा. इंदिरानगर) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी पतीसह सासरच्यांवर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़

आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
न शिक : हुंड्यासाठी छळ केल्यामुळेच बहिणीने आत्महत्त्या केल्याची फिर्याद मयत विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर दशरथ वाघमारे (रा. इंदिरानगर) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी पतीसह सासरच्यांवर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ पंचवटीतील अमृतधाम येथे राहणार्या वनीता रोहिदास निर्मळ यांनी शनिवारी (दि़५) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली होती. पती रोहिदास निर्मळ, सासरे प्रवीण निर्मळ, सासू लताबाई निर्मळ हे माहेरून एक लाख रुपये आणावेत यासाठी छळ करीत होती़ या छळास कंटाळूनच वनीताने आत्महत्त्या केल्याचे फिर्यादित म्हटले आहे़ (प्रतिनिधी)