भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्धेचा करुण अंत
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:32+5:302015-02-15T22:36:32+5:30
नागपूर : उपचारासाठी मेडिकलकडे निघालेल्या वृद्धेला भरधाव मोटरसायकलची धडक बसल्यामुळे तिचा करुण अंत झाला. शुक्रवारी सकाळी ९.१५ वाजता उमरेड मार्गावर ही घटना घडली.

भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्धेचा करुण अंत
न गपूर : उपचारासाठी मेडिकलकडे निघालेल्या वृद्धेला भरधाव मोटरसायकलची धडक बसल्यामुळे तिचा करुण अंत झाला. शुक्रवारी सकाळी ९.१५ वाजता उमरेड मार्गावर ही घटना घडली.पद्मा लक्ष्मणराव उघडे (वय ६०) असे मृत वृद्धेचे नाव आहे. त्या पंचवटी वृद्धाश्रमात राहात होत्या. शुक्रवारी सकाळी त्या औषधोपचारासाठी मेडिकलला जात होत्या. त्यांना वृद्धाश्रमाच्या प्रवेशद्वारासमोरच एका मोटरसायकलचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांचा करुण अंत झाला. दिगंबर मोहनीराम कुलकर्णी (वय ८५) यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे. पद्मा उघडे यांच्या अपघाती मृत्यूमुळे वृद्धाश्रमात तीव्र शोककळा पसरली आहे.----