करवाही जोड
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:21+5:302015-02-14T23:52:21+5:30
चिकाटीवृत्ती असल्याने पाहता पाहता सीताने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर नाव कोरले.

करवाही जोड
च काटीवृत्ती असल्याने पाहता पाहता सीताने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर नाव कोरले. प्रत्येक पातळीवर खेळण्याकरिता ये-जा करण्यासाठी तिला पैशाची गरज भासायची. परंतु बहिणीचे क्रीडा क्षेत्रातील यश पाहून तिच्या भावाने उसणवारी करून तिला प्रत्येक पातळीवर खेळण्यासाठी पाठविले. गेल्या महिन्यात राष्ट्रीय पातळीवर बाजी मारल्यानंतर तिची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली. यासाठी तिला ३० ते ३५ हजार रुपयांची गरज होती. आधीच उसणवारी, पैशाची चणचण असताना तिच्या कुटुंबाने पुन्हा एकदा तिच्यासाठी रान पिंजून काढले. अनेकांपुढे हात पसरले. मात्र समाजभान विसरलेल्यांकडून दमडीही मिळाली नाही. अखेरच्या क्षणी घरच्यांनी सीताला धीर देत कसेतरी तेवढे पैसे जमविले आणि ती आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत खेळली.........आदिवासी भागातून एकमेव खेळाडूआंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवडलेल्या नऊ खेळाडूंच्या चमूमध्ये तिच्यासह अन्य दोघी महाराष्ट्रातील तर उर्वरित खेळाडू हे परराज्यातील होते. अंतिम सामना हा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान झाला. त्यात सीता असलेल्या भारतीय संघाने उपविजेतेपद पटकावले. या संघात सीता उईके, प्रियदर्शिनी वानखडे, शुभदर्शिनी वानखडे या तिघी महाराष्ट्रातील तर श्रद्धा सिंग (उत्तर प्रदेश), अनामिका (पश्चिम बंगाल), गीता, यामिनी, मोनालीसह अन्य एका खेळाडूचा समावेश होता़ या संघाचे प्रशिक्षक उत्तराखंडचे अनिल सिंग हे होते़