शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

वृद्ध पालकांचा सांभाळ मुलांचे नैतिक कर्तव्य, कायदेशीर जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 12:40 IST

पूर्वी अंगमेहनत करणाऱ्या वडिलांना वृद्धापकाळामुळे आता काम होत नाही. त्यामुळे तो उपजीविकेसाठी मुलावर अवलंबून आहेत. मात्र, मुलगा त्यांना मदत करण्यास तयार नाही.

खुशालचंद बाहेती - नवी दिल्ली : वृद्ध आई-वडिलांना सांभाळणे हे मुलांचे नैतिक कर्तव्य आहे आणि याचबरोबर ती कायदेशीर जबाबदारीही आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. गवंडी काम करणाऱ्या ७२ वर्षीय व्यक्तीस दोन मुलगे आणि सहा मुली अशी आठ अपत्ये आहेत. पश्चिम दिल्लीत २७५ स्क्वेअर फुटांचे त्यांचे घरही आहे. या घराची त्यांनी सर्व मुलांत वाटणी करून दिली आहे. त्यांच्या विवाहित मुलींनी आपल्या वाट्याला आलेला घराचा भाग वडिलांना राहण्यासाठी दिला. त्यामुळे या घरात त्यांना थोडी हक्काची जागाही मिळाली. त्यांचा मोठा मुलगाही याच घरात राहतो.पूर्वी अंगमेहनत करणाऱ्या वडिलांना वृद्धापकाळामुळे आता काम होत नाही. त्यामुळे तो उपजीविकेसाठी मुलावर अवलंबून आहेत. मात्र, मुलगा त्यांना मदत करण्यास तयार नाही. २०१५ मध्ये त्यांनी मुलाकडून पोटगी मिळावी म्हणून कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने २०१७ मध्ये मुलाने दरमहिना सहा हजार रुपये वडिलांना द्यावेत व २०१५ पासूनच्या थकबाकीपोटी एक लाख ६८ हजार द्यावेत, असा निकाल दिला. मुलाने यापैकी फक्त ५० हजार रुपये दिले. वडील पुन्हा न्यायालयातगेले. न्यायालयाने यावेळी दरमहा १० हजार देण्याचे व या नवीन दराने थकबाकी देण्याचे आदेश दिले. मुलगा गुत्तेदार आहे.  जमीन खरेदी-विक्रीची दलालीही करतो; पण मुलाने पैसे देण्याऐवजी वेगवेगळ्या न्यायालयांत अर्ज केले.जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयाचे एकलपीठ, खंडपीठ इतकेच नव्हे, तर पैसे देण्याचे आदेश रद्द करून घेण्यासाठी वडिलांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयातही गेला. मुलाने न्यायालयात अनेक सबबी मांडल्या. वडील स्वत: काम करून कमावण्यास सक्षम आहेत. मला स्वत:ते इतके उत्पन्न नाही की मी १०हजार रुपये महीना पोटगी देऊ शकेल . याशिवाय न्यायालयाने पत्नीची मालमत्ता आपली असल्याचे समजून १० हजारांची पोटगी ठरवली, असे मुद्दे समोर केले.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले...सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा, न्या. एस. बोपण्णा, हिमा कोहली यांच्यासमोर बाजू मांडताना मुलाच्या वकिलाने मुलाच्या पत्नीच्या उत्पन्नातून पोटगीची अपेक्षा करणे व तसे न्यायालयाने आदेश देणे चुकीचे आहे असा मुद्दा मांडला.

यावर उद्विग्न होऊन सर्वोच्च न्यायालयाने ते तुमचे नैतिक कर्तव्य व कायदेशीर जबाबदारी आहे. ७२ वर्षे वयाच्या वडिलांना १० हजार पोटगीसाठी तुम्ही या न्यायालयातून त्या न्यायालयात खेचत आहात. यावर उद्विग्न होऊन सर्वोच्च न्यायालयाने ते तुमचे नैतिक कर्तव्य व कायदेशीर जबाबदारी आहे. ७२ वर्षे वयाच्या वडिलांना १० हजार पोटगीसाठी तुम्ही या न्यायालयातून त्या न्यायालयात खेचत आहात. काय झाले आहे तुम्हाला? कोणीही वृद्ध पालकांसोबत न्यायालयात लढाई करू नये. त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. कोणत्याही वृद्धाच्या आयुष्यात असे दिवस येऊ नयेत, असे उद्गार काढत मुलाचे अपील फेटाळले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय