शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

"जनतेच्या सुरक्षिततेसाठी लसीची खूप गरज पण लस मिळवण्याच्या स्पर्धेत आम्ही टिकणार नाही, आम्हाला... "; "या" देशाचं मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 11:18 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील अनेक देश हे कोरोना लसीसाठी आता भारताकडे मदत मागत आहेत.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 9 कोटींचा टप्पा पार केला आहे. लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे काही देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जगभरातील अनेक देश हे कोरोना लसीसाठी आता भारताकडे मदत मागत आहेत. भारताकडे मदत मागणाऱ्या या देशांच्या यादीमध्ये आता डोमिनिकन रिपब्लिकच्या नावाचाही समावेश झाला आहे. डोमिनिकन रिपब्लिकचे पंतप्रधान रूझवेल्ट स्कॅरिट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. तसेच भारताने कोरोना लसीचे 70 हजार डोस मदत म्हणून पाठवावेत अशी मागणी केली आहे. 

भारताने भूतान आणि मालदीव या देशांना कोरोना लसींचा पुरवठा केला आहे.  भारत सरकारने कोरोना लसीकरण मोहिमेसाठी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार डोमिनिकन रिपब्लिकचे पंतप्रधान स्कॅरिट यांनी पत्रात "जगाने 2021 मध्ये प्रवेश केल्यानंतरही आपल्या सर्वांची कोविड-19 विरोधातील लढाई सुरू आहे. डोमिनिकनमधील 72 हजार लोकसंख्येला कोरोना लसीची खूप गरज आहे. यासाठी मी तुमच्याकडे विनंती करतो की, आमच्या देशातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्या गरजेनुसार कोरोना लसीचे डोस मदत म्हणून पाठवून आम्हाला सहकार्य करावे" असं म्हटलं आहे.

"आमचा देश हा एक छोटसं बेट असून तो विकसनशील देशांपैकी एक आहे. कोरोना लसींसाठी सध्या जगभरात स्पर्धा सुरू असून या मोठ्या देशांच्या कोरोना लस मिळवण्याच्या स्पर्धेत आम्ही टिकणार नाही. त्यामुळेच भारताने आम्हाला मदत करावी" असं म्हणत पंतप्रधानांनी पत्राच्या माध्यमातून मदत मागितली आहे. डोमिनिकन रिपब्लिकचे भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. जम्मू काश्मीरला देण्यात आलेल्या विशेष दर्जा हटवण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर चीन पाकिस्तानचे समर्थन करत असतानाच कॅरेबियन बेट समुहांमध्ये असणाऱ्या या देशाने भारताची बाजू घेतली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आधीच जागतिक स्तरावरील जबाबदारी ओळखून भारत अनेक देशांना कोरोना लसीसाठी मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी