खारफुटीची कार्बन शोषण्याची क्षमता घटली
By Admin | Updated: August 5, 2014 02:48 IST2014-08-05T02:48:13+5:302014-08-05T02:48:13+5:30
वाढत्या प्रदूषणाने सुंदरबनातील खारफुटीच्या जंगलाची कार्बन डायऑक्साईड शोषण्याची क्षमता वेगाने घटत असल्याचे एका शोधात आढळून आले आहे.

खारफुटीची कार्बन शोषण्याची क्षमता घटली
कोलकाता : पाण्याच्या खारेपणातील वाढ, बेसुमार जंगलतोड आणि वाढत्या प्रदूषणाने सुंदरबनातील खारफुटीच्या जंगलाची कार्बन डायऑक्साईड शोषण्याची क्षमता वेगाने घटत असल्याचे एका शोधात आढळून आले आहे.
‘ब्ल्यू कार्बन इस्टिमेशन इन कोस्टल झोन ऑफ इस्टर्न इंडिया-सुंदरबन्स’ शीषर्काखालील या संशोधनासाठी केंद्र शासनाने अर्थसाहाय्य दिले होते आणि प्रसिद्ध सागरी शास्त्रज्ञ अभिजित मित्र यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. या संशोधनाचे निष्कर्ष एका अहवालात मांडण्यात आले आहेत.
या अहवालानुसार, जगातील या सर्वात मोठय़ा त्रिभुज प्रदेशातील (डेल्टा) खारफुटीचे जंगल, दलदलीतील गवत, पाण्यातील जिवाणू, जीवजंतू व किना:यावरील इतर झाडे कार्बन डाय ऑक्साईडचे नैसर्गिक अवशोषक आहेत. झाडांत साठवून ठेवण्यात आलेल्या कार्बनला ब्ल्यू कार्बन म्हणून ओळखले जाते. कार्बन डाय ऑक्साईडचे शोषण ही एक प्रक्रिया असून त्यामुळे पृथ्वीचे तापमान कमी होण्यास त्याचप्रमाणो वातावरण बदलाचे विपरीत परिणाम कमी होण्यास मदत होते. हा अहवाल तयार करण्यास तीन वर्षे लागली आणि गेल्या वर्षी तो शासनाला सादर करण्यात आला.
या संशोधनात सहभागी झालेल्या शास्त्रज्ञांनी सुंदरबन आणि त्यातल्या त्यात सुंदरबनच्या मध्य भागासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. संशोधनासाठी सुंदरबन जंगलाची पश्चिम, पूर्व आणि मध्य अशा तीन भागांत विभागणी करण्यात आली होती. मध्य भागातील परिस्थिती ही धोक्याचा इशारा देणारी आहे. खारफुटीच्या जंगलाची व विशेष करून तेथील बायने प्रजातीची कार्बन डाय ऑक्साईड शोषण्याची क्षमता प्रचंड प्रमाणात घटली आहे, असे या संशोधन पथकाच्या एक सदस्य आणि वरिष्ठ सागरी जीवशास्त्रज्ञ सुफिया झमान यांनी सांगितले. खारफुटीच्या जंगलातील बायने प्रजातीवर मुख्यत्वे संशोधन करण्यात आले. या जंगलात खारफुटीच्या इतर आणखी 34 प्रजाती आहेत, असे मित्र यांनी सांगितले. सुंदरबनच्या मध्य भागातील बायने वृक्षांची कार्बन डाय ऑक्साईड शोषण्याची क्षमता 22 टन प्रति हेक्टर एवढी आढळून आली, तर पूर्व भागात हीच क्षमता 55 टन प्रति हेक्टर एवढी नोंदली गेली. यावरून मध्य भागातील प्रजातींची कार्बन शोषण्याची क्षमता कमी झाल्याचे सिद्ध होते.
वातावरणातील कार्बनचे कमी शोषण म्हणजे त्याचे वातावरणातील प्रमाण अधिक हे सूत्र असून आधिक्य तापमानवाढीस कारणीभूत असते. त्यामुळे मित्र यांना ही परिस्थिती धोकादायक वाटते. इंडोनेशिया आणि व्हिएतनाममधील खारफुटीच्या जंगलांची कार्बन डाय ऑक्साईड शोषणाची क्षमता अनुक्रमे 114 व 8क् ते 9क् टन प्रतिहेक्टर एवढी आहे. (वृत्तसंस्था)
4सुंदरबनच्या या समस्येमागे माटला नदीतील पाण्याचा खारेपणा मोठय़ा प्रमाणात वाढणो हे प्रमुख कारण असल्याचे मित्र यांनी सांगितले. खारफुटीचे जंगल ताज्या पाण्यावर वाढते. मात्र, ताज्या पाण्याच्या अभावामुळे खारफुटीच्या जंगलाची उंची झपाटय़ाने खालावली आहे. त्यामुळे त्याची कार्बन शोषण करण्याची क्षमता घटली, असे त्यांनी सांगितले. सुंदरबनच्या पूर्व भागात ताजे पाणी उपलब्ध असल्याने तेथील झाडांची उंची मध्य भागाच्या तुलनेत अधिक आहे. याशिवाय बेसुमार जंगलतोड, वाढते प्रदूषण आदी कारणोही असल्याचे ते म्हणाले.