शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

नव्या पाहुण्याला घेऊन घरी निघालेलं कुटुंब वाटेतचं संपलं; दोन दिवसांच्या चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:06 IST

उत्तराखंडमध्ये अनियंत्रित कार कालव्यात कोसळून चौघांचा मृत्यू झाला.

Haldwani Accident:उत्तराखंडमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. बुधवारी सकाळी हल्द्वानी येथे झालेल्या एका भीषण अपघातात नवजात बाळासह चार जणांचा मृत्यू झाला. नवीन मंडी कडून यूओयूकडे जाणाऱ्या एका कारचे नियंत्रण सुटले आणि ती पाण्याने भरलेल्या कालव्यात पडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असून दोघे गभीर जखमी आहेत. बऱ्याच प्रयत्नानंतर गाडी कालव्यातून बाहेर काढण्यात आली. कारचा चुराडा झाला होता.

उत्तराखंडमधील हल्द्वानी जिल्ह्यात कार अनियंत्रित होऊन कालव्यात पडली. कारमधील चार जणांचा मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी माहिती दिल्यानंतर  पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह कालव्यातून काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन दिवसांच्या नवजात शिशु आणि त्याच्या वडिलांसह चार जणांचा मृत्यू झाला. तर चालकासह दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातातून गाडीत प्रवास करणारी महिला बचावली, पण दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या तिच्या मुलाला वाचवता आले नाही. तिच्या पतीचाही मृत्यू झाला. 

किच्छा यूएस नगरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील एका गर्भवती महिलेने सोमवारी एका नवजात बाळाला जन्म दिला होता. बुधवारी, महिलेचा पती, आई आणि दीर तिला आणि नवजात बाळाला घरी घेऊन जाण्यासाठी कारमधून आले होते. सात वाजता संपूर्ण कुटुंब गाडीने किच्छा येथे निघाले. अग्निशमन केंद्रासमोरील वळणाजवळ ५०० मीटर पुढे गेल्यानंतर, गाडी अनियंत्रित झाली आणि ती भरुन वाहणाऱ्या कालव्यात पडली. या अपघातात नवजात बाळ, त्याचे वडील, आजी आणि काका यांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले.

दरम्यान, अग्निशमन केंद्राच्या मागे घडलेल्या या घटनेनंतर अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले. या दरम्यान, कालव्याच्या प्रवाहात अग्निशमन दलाचा एक कर्मचारी वाहून गेला, मात्र त्याने कार चालकाला वाचवले आणि स्वतःचाही जीव वाचवला. मृतांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघात