हायवेवरून कार गेली थेट घराच्या छतावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:44 IST2018-03-19T01:44:03+5:302018-03-19T01:44:03+5:30

रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या आणि मध्येच जम्प मारणा-या कार तुम्ही चित्रपटात तर खूप पाहिल्या असतील, पण स्टंट सीनलाही मागे टाकेल, अशी एक घटना नुकतीच हिमाचल प्रदेशात घडली आहे.

The car went directly from the highway to the roof of the house | हायवेवरून कार गेली थेट घराच्या छतावर

हायवेवरून कार गेली थेट घराच्या छतावर

नवी दिल्ली- रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या आणि मध्येच जम्प मारणा-या कार तुम्ही चित्रपटात तर खूप पाहिल्या असतील, पण स्टंट सीनलाही मागे टाकेल, अशी एक घटना नुकतीच हिमाचल प्रदेशात घडली आहे. त्याचे झाले असे की, सरकाघाट नॅशनल हायवे-७० वरून एक कार वेगाने जात होती. बन्सीलाल नावाचा चालक ही कार चालवत होता. या महामार्गावरून जात असताना, अचानक कारचा वेग त्याच्याकडून वाढला आणि ही कार रस्ता सोडून थेट बाजूला गेली. कारचा वेग एवढा होता की, ती रस्त्यावरून उडून थेट १२ फूट अंतरावरील एका घराच्या छतावर जाऊन थांबली. या कारच्या धडकेने छतावरील पाण्याच्या टाकी फुटून गेली. सुदैवाने कारच्या चालकाला या अपघातात काही इजा झाली नाही. कारचेही विशेष नुकसान झाले नाही. घराच्या छतावर मात्र मोठा आवाज झाल्याने घरातील लोक धावतच बाहेर आले आणि पाहतायत तर काय, छतावर चक्क कार. छतावर कार उभी असलेला एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. परिसरात हा चर्चेचा विषय आहे.

Web Title: The car went directly from the highway to the roof of the house