भरधाव मोटारीने ठोकरले, दोन ठार, तीन जखमी
By Admin | Updated: January 20, 2015 00:25 IST2015-01-20T00:25:00+5:302015-01-20T00:25:00+5:30
पिंपळे गुरव : सहा महिन्यांच्या चिमुरडीचा मृतांत समावेश, आई-आजी गंभीर

भरधाव मोटारीने ठोकरले, दोन ठार, तीन जखमी
प ंपळे गुरव : सहा महिन्यांच्या चिमुरडीचा मृतांत समावेश, आई-आजी गंभीर रहाटणी : रात्री सव्वा-साडेनऊची वेळ... पिंपळे गुरवकडून पिंपळे सौदागरला जाणारा रस्ता..., जगताप पेट्रोलपंपाच्या दिशेने एक पांढर्या रंगाची इंडिका कार वायूवेगाने आली आणि काही समजण्याच्या आत तिने तीन महिलांसह दोन वाहनांना धडक दिली. या अपघातात दोन जण ठार झाले असून, २ जण गंभीर, तर एक जण किरकोळ जखमी आहे. कारमधील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसरा पळून गेला आहे. कारचालक दारू पिऊन वाहन चालवित होता, असे पोलिसांनी सांगितले.मृतांमध्ये दुचाकीस्वार रमाकांत दिघे (वय ४५, रा. बळीराज कॉलनी, रहाटणी), स्वरा संदीप सुर्वे (वय ६ महिने ) यांचा समावेश आहे, तर गंभीर जखमींमध्ये मुलीची आई सविता संदीप सुर्वे, आजी सुनंदा विठ्ठल सुर्वे, रिक्षाचालक चंद्रकांत धोंडिबा झिरंग (वय ४५, रा. नवी सांगवी) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. पिंपळे गुरवमधील जगताप पेट्रोलपंपाकडून येणारा रस्ता पिंपळे सौदागर ते नाशिक फाटा या ४५ मीटर रस्त्याला जोडला आहे. रात्री सव्वानऊच्या सुमारास एक इंडिका मोटार (एमएच १४ बीए ३८२९) पिंपळे गुरवकडून भरधाव वेगाने पंचेचाळीस मीटर रस्त्याच्या दिशेने निघाली. सुरूवातीला पेट्रालपंपाजवळ रस्त्यावरून चालणार्या तीन जणांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर न थांबता ती मोटार आणखी जोरात निघाली. तेथूनच काही अंतरावर असणार्या दुचाकीला (एमएच १२ डीपी ७७५६) जोरदार ठोकर देऊन पुढे एका रिक्षाला (एमएच एससी ५२३) जोरदार धडक दिली. त्यापुढे जाऊन ती मोटार सोडून देऊन त्यांतील एक जण पळून गेला. तर एक जण पोलिसांच्या हाती लागला आहे. ही घटना घडताच पंधराच मिनिटतिं सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल केले.