शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

पोलीस रेकॉर्डमध्ये कार जप्त अन् प्रत्यक्षात कुटुंबच करतंय वापर; नेमकं काय आहे हे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 12:22 IST

ईडीच्या छाप्यात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांच्या कागदपत्रांनुसार, आमदार इरफान सोलंकी यांची गाडी, जी जप्त करण्यात आली आहे, त्यांच्याच घरी पार्क केलेली आढळली.

कानपूरमधील सपा आमदार इरफान सोलंकी यांच्या तीन गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मात्र त्यातील दोन कार तर आमदारांच्या निवासस्थानीच पार्क केलेल्या आढळल्या आहेत. जप्त केलेल्या या गाड्या आमदारांच्या कुटुंबातील सदस्य चालतात, असं सांगितलं जात आहे. सोलंकी यांना जेलमध्ये भेटायला जाण्यासाठी कुटुंबीय याच कारचा वापर करायचे. मात्र याच दरम्यान जप्त केलेल्या गाड्या या आमदाराच्या घरापर्यंत परत कशा पोहोचल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

ईडीच्या छाप्यात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांच्या कागदपत्रांनुसार, आमदार इरफान सोलंकी यांची गाडी, जी जप्त करण्यात आली आहे, त्यांच्याच घरी पार्क केलेली आढळली. कारचा वापर कुटुंबीय करत होते. त्याचवेळी जप्त केलेली आणखी एक कारही गायब असल्याचं आढळून आलं आहे.  पोलिसांनी जेलमध्ये असलेल्या इरफान सोलंकी यांची 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचा दावा केला आहे. यामध्ये त्याच्या टाटा सफारी, क्रेटा आणि आय-10 या तीन गाड्याही जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण गुरुवारी ईडीने इरफानच्या घरावर छापा टाकला तेव्हा काळ्या रंगाची क्रेटा कार उभी केलेली आढळली. ही तीच कार होती जी पोलिसांनी जप्त केली होती. मात्र ही कार इरफान यांच्या घरी सापडली.

या प्रकरणात, पोलिसांनी एक प्रेस नोट जारी केली आहे ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की आमदाराची तीन वाहनं जप्त करण्यात आली आहेत. यूपीमधील कानपूरमधील समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने अलीकडेच सिसामाऊ मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले इरफान सोलंकी आणि त्याचा भाऊ रिझवान सोलंकी यांच्यासह त्याच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले आहेत. दोन्ही भाऊ सध्या जेलमध्ये आहेत.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारी