कॅप्टन ऑफ पोर्ट्सकडे साळ नदीची सफाई

By Admin | Updated: June 10, 2014 01:50 IST2014-06-10T00:55:53+5:302014-06-10T01:50:42+5:30

मंत्री फुर्तादंकडून पाहणी : अधिकार्‍यांसोबत घेतला आढावा

Captain of Ports cleaned the river Sal | कॅप्टन ऑफ पोर्ट्सकडे साळ नदीची सफाई

कॅप्टन ऑफ पोर्ट्सकडे साळ नदीची सफाई

मंत्री फुर्तादंकडून पाहणी : अधिकार्‍यांसोबत घेतला आढावा
मडगाव : प्रदूषित साळ नदीच्या सफाईचे काम आता कॅप्टन ऑफ पोर्ट्स हाती घेणार आहे. या नदीत गाळ साचला असून त्याची सफाई करण्याच्या कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. मच्छीमारमंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी सोमवारी गोवा किनारी विभाग व्यवस्थापकीय प्राधिकरण व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत बोटीतून खारेबांध ते सिकेटीपर्यंत नदीची पहाणी केल्यानंतर साळ नदी प्रदूषनविरहित होण्यासाठी आता कामाला सुरुवात होणार असल्याचे संकेत दिले.
यावेळी वनखात्याचे तसेच गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ व नदी परिवहन खाते, आमदार बेंजामीन सिल्वा व कायतान सिल्वा हजर होते. सोमवारी नदीच्या पहाणीचा अहवाल संबंधित खात्याकडून सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कामाला सुरवात होणार असून आपण या संबंधी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री फुर्तादो यांनी दिली.
निवडणुकीच्या वेळी दूषित साळ नदीची सफाईकाम हाती घेण्याचे आश्वासन आपण मतदारांना दिले होते, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. साळनदीच्या दोन्ही बाजुला झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून पाणी वाहून जाण्यास वाट मिळत नाही, यासाठी वनखात्याने सफाईचे काम हाती घ्यावे, अशी सूचना उपस्थित अधिकार्‍यांना त्यांनी केली. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी लेविन्सन मार्टिन्स, गोवा किनारी विभाग व्यवस्थापकीय प्राधिकरणाचे डॉ. आंतोनियो मास्कारेन्हास, डॉ. नितीन सावंत व अन्य अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
ढँङ्म३ङ्म :0906-टअफ-09
साळ नदीची बोटीतून पहाणी करताना मच्छीमारमंत्री आवेर्तान फुर्तादो. बाजूला आमदार कायतान सिल्वा व संबंधित खात्याचे अधिकारी. (छाया: अरविंद टेंगसे)

Web Title: Captain of Ports cleaned the river Sal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.