शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

का झाली खलिस्तानी दहशतवादी निज्जरची हत्या? पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 23:33 IST

"एखाद्या देशाच्या पंतप्रधानाने, कसल्याही प्रकारचा पुरावा नसताना, केवळ मतांसाठी, अशा प्रकारची वक्यव्य करणे बेजबाबदारपणाचे आहे."

खलिस्तानी कार्यकर्ता हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. त्यांचा हा दावा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी फेटाळला. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, ही हत्या कॅनडातील गुरु नानक शिख गुरुद्वारा आणि सर्रे व्यवस्थापनातील गटबाजीचा  परिणाम आहे.

अमरिंदर सिंग म्हणाले, ट्रूडो हे दुर्दैवाने व्होट बँकेच्या राजकारणात अडकले आहेत आणि त्यांनी भारत-कॅनडाचे राजनैतिक संबंध पणाला लावले आहेत. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाने, कसल्याही प्रकारचा पुरावा नसताना, केवळ मतांसाठी, अशा प्रकारची वक्यव्य करणे बेजबाबदारपणाचे आहे. 

एका हॉटेलमध्ये भेटले होते ट्रूडो आणि कॅप्टन -कॅप्टन म्हणाले,  कॅनडाच्या जमिनीचा वापर भारता विरोधात कशा प्रकारे होत आहे, हे आपण ट्रुडो यांच्या निदर्शनास आणून दिले होते. ते म्हणाले, 2018 मध्ये आपण अमृतसरमधील एका हॉटेलमध्ये ट्रूडो यांना भेटलो होते. तेव्हा आपण त्यांच्यासोबत बरीच माहिती शेअर केली होती. मात्र, कॅनाडा सरकारने कुठल्याही प्रकारे सुधारात्मक पावले उचलण्या ऐवजी, त्या देशात भारत विरोधी कामात वाढ झाली आहे. 

अमरिंदर सिंग यांनी कॅनाडाच्या राजनयिकाला निष्कासित करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचेही कौतुक केले आहे. 

टॅग्स :Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगJustin Trudeauजस्टीन ट्रुडोCanadaकॅनडाNarendra Modiनरेंद्र मोदी