शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

"प्रेमावर विश्वास ठेवता येत नाही असं म्हणायला लागतंय"; ग्रीष्माला फाशीची शिक्षा दिल्यावर कोर्टाची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:16 IST

केरळमध्ये गाजलेल्या शेरॉन राज हत्या प्रकरणात कोर्टाने मुख्य आरोपी ग्रीष्मा हिला फाशीची शिक्षा सुनावली.

Sheron Raj Murder Case:  शेरोन राज हत्याकांडातील दोषी ग्रीष्माला केरळन्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. २३ वर्षीय शेरॉन राजला विष देऊन मारल्याप्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आलं होतं. ऑक्टोबर २०२२ मध्ये तिरुवनंतपुरममध्ये अवयव निकामी झाल्यामुळे शेरॉनचा मृत्यू झाला. नंतर तपासात उघड झाले की त्याची प्रेयसी ग्रीष्माने त्याला विष दिले होते. नेयट्टिनकारा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने म्हटलं की, ती सुधारण्याच्या पलीकडे आहे कारण तिने पीडिताला दुःख देण्याचा सक्रियपणे प्रयत्न केला तसेच मृत्यूपूर्वी अत्यंत वेदना देण्यासाठी योजना आखली होती.

ग्रीष्माने प्रेमसंबंधातून बाहेर पडण्यासाठी त्याचा खून करण्याचा कट रचला आणि त्याला तणनाशकाने भरलेले आयुर्वेदिक मिश्रण दिले. तिचा विवाह दुसऱ्या व्यक्तीशी होणार असल्यामुळे आणि शेरोन त्या नात्यापासून मागे हटत नसल्याने तिने हे केले. शेरोनला ११ दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी त्याला तीव्र वेदना होत होत्या आणि त्याचे अवयव एकामागून एक निकामी होत होते. मरण्यापूर्वी त्याने त्याच्या वडिलांना सांगितले की तो ग्रीष्माच्या घरी गेला होता आणि तिथे त्याला प्यायला औषध दिले होते. 

"ग्रीश्माने शेरोनला इंचाने इंचाने मारले"

ही सध्याच्या गुन्ह्यासारखीच मोडस ऑपरेंडी होती. आरोपीने रसात पॅरासिटामॉल मिसळून खून करण्याचा प्रयत्न होता, असा निष्कर्ष काढता येईल. क्रूर मानसिकता असलेली महिलाच प्रियकरासोबत असा गुन्हा करू शकते आणि त्यामुळे ती दयेची पात्र नाही. या हत्येमुळे समाजात एक संदेश गेला आहे की एक मुलगी तिच्या प्रियकराचे नाते तोडल्यानंतर सहजपणे त्याची हत्या करू शकते. यामुळे प्रेमी आणि मित्रांमध्ये भीती निर्माण झाली आहे, असं कोर्टानं म्हटलं.

"यामुळे असा संदेश गेलाय की प्रियकरावर विश्वास ठेवता येत नाही. आजकाल तरुणाई लिव्ह इन रिलेशनशिपचा वापर करत आहे. जर ते हलक्यात घेतले तर ते वापरणे आणि फेकून देण्यासारखे आहे. त्यामुळे कोणीही आपल्या जोडीदाराला सहजपणे लक्ष्य करू शकतो. यामुळे समाजात चुकीचा संदेश जातोय," असं न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान म्हटलं.

दरम्यान, १४ ऑक्टोबर २०२२ ग्रीष्माने शेरॉनला तिच्या कन्याकुमारी येथील रामवर्मनचिराई येथील घरी बोलावले होते. ग्रीष्माने शेरॉनला एक आयुर्वेदिक टॉनिक प्यायला दिले. शेरॉनने ते प्यायले. घरातून बाहेर पडल्यानंतर शेरॉनला उलट्या होऊ लागल्या. शेरॉनच्या पालकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. पण त्यांची प्रकृती खालावत गेली. त्याच्या आई-वडिलांना ग्रिष्माकडून जाणून घ्यायचे होते की तिने शेरॉनला नेमके काय खायला दिले होते. पण तिने हे सत्य लपवून ठेवले. त्यामुळे उशीर झाला आणि शेरॉनला जीव गमवावा लागला.

टॅग्स :KeralaकेरळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय