शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावरील उपचारांसाठी मुंग्यांची चटणी वापरण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणालं, आधी जाऊन लस घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 18:52 IST

जगभरात शास्त्रज्ञ कोरानावरील उपचारासाठी संशोधन करत आहेत. अशात एका पारंपारिक उपचारालाही कोरोनावार परवानगी द्यावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme court)  दाखल करण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळाली आहे.

कोरोनावरील (corona) उपचारासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. जगभरात शास्त्रज्ञ कोरानावरील उपचारासाठी संशोधन करत आहेत. अशात एका पारंपारिक उपचारालाही कोरोनावार परवानगी द्यावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme court)  दाखल करण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळाली आहे.

हा पारंपरिक उपचार म्हणजे लाल मुंग्यांची चटणी. आदिवासी समाजात हा पदार्थ बनवला जातो. दरम्यान संपूर्ण देशभरात कोरोनासाठी अशा पारंपारिक उपचाराला  परवानगी नाही देऊ शकत, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. कोर्टाने म्हटलं, कित्येक पारंपारिक उपचार आहेत. आपल्या घरातही अनेक पारंपारिक उपचार केले जातात. पण या उपचारांचा परिणाम स्वतःला भोगावा लागतो. संपूर्ण देशासाठी आम्ही अशा पारंपारिक उपचाराचा अवलंब करण्याती परवानगी नाही देऊ शकत.

ओडिशातील आदिवासी समाजाचे सदस्य नायधर पाढीयाल यांनी ही याचिका दाखल केली होती. सुरुवातीला ओडिशा हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी लाल मुंग्यांच्या  चटणीचा वापर कोरोनाच्या विषाणूवर (Covid -19 ) केला जाऊ शकतो, असा दावा काही जण करत होते. हा दावा कितपत खरा आहे हे तपासण्यासाठी आयुष मंत्रालयाने संशोधन करावं, असा आदेश हायकोर्टाने दिला होता. त्यानंतर हायकोर्टाने याचिका फेटाळाली. ओडिशा हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. पण आता सुप्रीम कोर्टानेसुद्धा याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्याला कोर्टाने कोरोना लस घेण्याचे निर्देश दिले आहेत.

काय असतं या मुंग्यांच्या चटणीत?पाढीयाल यांच्या मते, चटणीमध्ये फॉर्मिक अ‍ॅसिड, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२, जिंक आणि लोह असते. ही मुलद्रव्ये आपली रोगप्रतिकारक शक्तीत सुधारणा करतात. त्यांनी पुढं सांगितलं की, 'ओडीसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांतील अनेक ठिकाणी लाल मुंग्यांचे सेवन केले जाते. तसेच याचा बर्‍याच रोगांवर उपचार म्हणून वापर केला जातो.' पाढीयाल यांच्या मते, आदिवासी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असण्यामागे हे देखील एक कारण असू शकते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याOdishaओदिशा