शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कायदा करा; सर्वोच्च न्यायालयाचे संसदेला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 11:36 IST

सर्वोच्च न्यायालयाकडून चेंडू संसदेच्या कोर्टात

नवी दिल्ली: गंभीर गुन्हे दाखल असलेल्या लोकप्रतिनिधींना आम्ही अपात्र ठरवू शकत नाही. त्यासाठी संसदेनं कायदा करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती राजकारणात येऊ नयेत, याची काळजी संसदेनं घ्यावी आणि त्यासाठी कठोर कायदे करावेत, असंदेखील न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे. एखादा उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असेल, तर न्यायालय त्याला निवडणूक लढवण्यापासून रोखू शकत नाही. त्यासाठी संसदेलाच कायदा करावा लागेल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. खून, बलात्कार आणि अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे खटले ज्यांच्याविरुद्ध सुरू आहेत, अशा व्यक्तींना लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवण्यास बंदी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली. केवळ आरोपपत्राच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यापासून रोखता येणार नाही, असं न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं. 'सर्वसामान्य जनतेला आपल्या नेत्याची पूर्ण माहिती असायला हवी. प्रत्येक नेत्यानं त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती निवडणूक आयोगाला द्यायला हवी. राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी संसदेनं कठोर कायदा करावा,' असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीवेळी म्हटलं. सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असा आदेश न्यायालयानं दिला आहे. आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती निवडणुकीआधी तीन वेळा वृत्तपत्रात आणि एकदा वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध होईल, याची काळजी घ्या, अशा सूचना न्यायालयानं दिल्या आहेत. पाच सदस्यीय खंडपीठानं याबद्दल सुनावणी केली. यामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन, न्यायमूर्ती एम. खानविलकर, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांचा समावेश होता. याबद्दलचा युक्तिवाद ऑगस्टमध्ये पूर्ण झाला होता. यानंतर न्यायालयानं या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला होता. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliticsराजकारणParliamentसंसद