शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? हार्दिक पटेलचा भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 9:13 AM

काही वेळासाठी मान्यही केलं की व्हिडीओमधील व्यक्ती मी आहे, तरी मला विचारायचं आहे की 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? जर का 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड नसेल, तर काय मग 50 वर्षाच्या व्यक्तीची असणार का ? असा प्रश्न हार्दिक पटेलने विचारला आहे

ठळक मुद्देहार्दिक पटेलने 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? असा प्रश्न विचारला आहेहार्दिक पटेल याचे अजून चार कथित सेक्स व्हिडीओ लीक करण्यात आले आहेत'सत्तेत बसलेले लोक दावा करत आहेत की हा माझा व्हिडीओ आहे. पण माझं म्हणणं आहे की हा बनावट आहे'

अहमदाबाद - पाटीदार नेता हार्दिक पटेल याचे कथित सेक्स व्हिडीओ सध्या गुजरातमधील राजकीय वादविवादाचा विषय बनले आहेत. हार्दिक पटेल याचे अजून चार कथित सेक्स व्हिडीओ लीक करण्यात आले आहेत. दरम्यान हार्दिक पटेलने 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? मग काय 50 वर्षाच्या व्यक्तीची असणार का ? असा प्रश्न विचारला आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पटेलने व्हिडीओमधील व्यक्ती आपण नसून, ही बनावट सीडी असल्याचा दावा केला आहे. 

कथित सेक्स सीडी समोर आल्यानंतर पाटीदार नेता हार्दिक पटेल भरुच येथील सरभन गावात सभेसाठी पोहोचला होता. यावेळी 10 गावातील लोक या सभेसाठी उपस्थित होते. मोठ्या थाटामाटात हार्दिक पटेलचं स्वागत करण्यात आलं. यावेळी हार्दिकने जवळपास 33 मिनिटांचं भाषण करत जनतेला भाजपाची हिटलरशाही नाकारण्याचं आवाहन केलं.

यावेळी हार्दिक पटेलला व्हिडीओमुळे तुझ्या मोहिमेला काही धक्का बसेल का ? असं विचारलं असता त्याने सांगितलं की, 'जनतेचा मिळणारा पाठिंबा तुम्ही पाहत आहात. या व्हिडीओमुळे मला काही नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं का ? मला काहीही फरक पडणार नाहीये. भाजपामध्ये असलेली अस्वस्थता आणि आपल्या कमतरता लपवण्यासाठी सुरु असलेली धडपड यामधून दिसत आहे. ते मला धमकावू किंवा ब्लॅकमेल करु शकत नाहीत. यासाठीच एका 23 वर्षीय तरुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारा व्हिडीओ तयार केला आहे'.

'सत्तेत बसलेले लोक दावा करत आहेत की हा माझा व्हिडीओ आहे. पण माझं म्हणणं आहे की हा बनावट आहे. हा व्हिडीओ माझ्यासारख्या दिसणा-या एखाद्या व्यक्तीचा आहे. हा व्हिडीओ मी परदेशात राहणा-या माझ्या काही ओळखीच्या लोकांना फॉरेन्सिक चाचणी कऱण्यासाठी पाठवला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ बनावट आहे', असं हार्दिक पटेलने सांगितलं आहे. 

'आणि काही वेळासाठी मान्यही केलं की व्हिडीओमधील व्यक्ती मी आहे, तरी मला विचारायचं आहे की 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? जर का 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड नसेल, तर काय मग 50 वर्षाच्या व्यक्तीची असणार का ? अटलबिहारी वाजपेयी एकदा बोलले होते की, मी विवाहित नाहीये, पण संन्याशीही नाही. एका भाजपा आमदाराने चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला, पण त्यावर भाजपा काहीच बोलत नाही. ही लढाई भाजपा विरुद्ध काँग्रेस नाही, तर भाजपा विरुद्ध हार्दिक आहे', असं हार्दिक पटेलने सांगितलं आहे. 

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017