उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन बाजार समिती निवडणूक : मेळाव्यांना वेग, महसूलमंत्रीही उतरणार प्रचारात

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:32+5:302015-08-26T23:32:32+5:30

जळगाव- जिल्‘ात सर्वात महत्त्वाची मानल्या जाणार्‍या जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून, दोन्ही पॅनलमध्ये शक्तीप्रदर्शन सुरू आहे. युती व काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये तीन आमदार सक्रिय असतानाच आता थेट महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे देखील या पॅनलसाठी प्रचार करणार आहे.

Candidates' power demonstration market committee election: In the campaign of rally, the revenue minister will also come | उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन बाजार समिती निवडणूक : मेळाव्यांना वेग, महसूलमंत्रीही उतरणार प्रचारात

उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन बाजार समिती निवडणूक : मेळाव्यांना वेग, महसूलमंत्रीही उतरणार प्रचारात

गाव- जिल्‘ात सर्वात महत्त्वाची मानल्या जाणार्‍या जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून, दोन्ही पॅनलमध्ये शक्तीप्रदर्शन सुरू आहे. युती व काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये तीन आमदार सक्रिय असतानाच आता थेट महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे देखील या पॅनलसाठी प्रचार करणार आहे.
३० रोजी मतदान होणार आहे. प्रचाराला आता दोनच दिवस राहिल्याने मेळाव्यांना वेग आला आहे. शेतकरी विकास पॅनलतर्फे पहिला मेळावा उमेदवार कैलास छगन चौधरी यांनी आव्हाणे शिवारात घेतला. यानिमित्त मोठे शक्तीप्रदर्शन झाले. याच पॅनलने नंतर तरसोद व मोहाडी येथे मेळावे घेतले. त्यात संतोष नारखेडे, प्रभाकर सोनवणे यांनी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला.
तर माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकरांच्या सर्वसामान्य शेतकरी विकास पॅनलने किनोद, अवचीत हनुमान आणि नंतर बुधवारी तरसोद येथे मेळावे घेतले. या पॅनलचे प्रमुख लक्ष्मण पाटील, त्यांचे सहकारी मच्िंछद्र पाटील, पंकज पाटील आदींनी संयोजन केले. कुणाच्या मेळाव्यात किती गर्दी होती यावरून आता चर्चा सुरू झाली आहे.

दोन मंत्री घेणार मेळावा
बाजार समितीत शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारासंबंधी २८ रोजी महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे हे शहरात शेतकरी मेळावा घेणार आहेत. याच मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजनदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आमदार गुलाबराव पाटील, सुरेश भोळे व प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी यासंबंधी नियोजन केल्याचे सांगण्यात आले.

इन्फो-
२५ हजार फुलीवरून गुलाबरावांचे आवाहन
कुणी २५ हजार रुपये फुली मतदाराला देत असेल तर ७८१ मतदारांसाठीचे पैसे आमच्या पॅनलला द्या. आमचे पॅनल हे पैसे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना देईल. तसेच या निवडणुकीत आमच्या एकाही उमेदवाराला मतदान करू नका असे जाहीर आवाहन मतदारांना करून विरोधी पॅनलमधील सर्व उमेदवारांना बाजार समितीची सत्ता देईल, असे आवाहन आमदार गुलाबराव पाटील यांनी मोहाडीच्या मेळाव्यात केले. त्यांचा हा संवाद व्हॉट्स ॲपवर फिरत असून, कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.

Web Title: Candidates' power demonstration market committee election: In the campaign of rally, the revenue minister will also come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.