भोपाळ - गेल्या 15 वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. भाजपाला टक्कर देण्यासाठी सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत करण्यावर काँग्रेसकडून पावले उचलण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून निवडणुकीतील उमेदवारीसाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणे कार्यकर्त्यांसाठी अनिवार्य करण्यात आले असून, ज्या कार्यकर्त्याचे फेसबूकवर 15 हजार लाइक्स आणि ट्विटरवर पाच हजार फॉलोअर्स असतील अशाच कार्यकर्त्याला विधानसभेचे तिकीट देण्यात येईल, असे फर्मान मध्य प्रदेश काँग्रेसने काढले आहे. मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीने उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नेते आणि कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिले हे. या पत्रामध्ये निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक अटीशर्थींचा उल्लेख करण्यात आला आहे. इच्छुक उमेदरवारांच्या फेसबूक पेजला किमान 15 हजार लाइक्स आणि ट्विटरवर पाच हजार फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. तसेच बूथ लेव्हल कार्यकर्त्यांचा एक व्हॉट्स अॅप ग्रुप असणे अनिवार्य आहे, अशा अटींचा उल्लेख या पत्रात आहे.
ज्याच्या फेसबुक पेजला १५ हजार 'लाईक' त्यालाच विधानसभेचं तिकीट; काँग्रेसचं अजब फर्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 16:44 IST