कर्करोग जनजागृती शिबिर

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:57+5:302014-12-20T22:27:57+5:30

मूर्तिजापूर: सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणार्‍या धर्म सेवा समिती मूर्तिजापूर यांच्यावतीने स्थानिक अग्रसेन भवनात येत्या २८ डिसेंबर रोजी महिला-पुरुषांसाठी आरोग्य व कर्करोग या विषयावर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे व नगराध्यक्ष पवन अव्वलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, २८ डिसेंबर रोजी दुपारी १ ते ४ हे शिबिर होणार आहे. जळगाव येथील सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. नीलेश चांडक हे कर्करोग होऊ नये म्हणून महिलांनी कोणती विशेष काळजी घ्यावी, तसेच कर्करोगाची लक्षणे, कारणे व त्यावरील उपाय, याविषयी स्लाईड शोद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. परिसरातील लोकांनी या शिबिराला उपस्थित राहून कर्करोगाबाबतच्या आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आयोजकांनी कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Cancer awareness camp | कर्करोग जनजागृती शिबिर

कर्करोग जनजागृती शिबिर

र्तिजापूर: सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणार्‍या धर्म सेवा समिती मूर्तिजापूर यांच्यावतीने स्थानिक अग्रसेन भवनात येत्या २८ डिसेंबर रोजी महिला-पुरुषांसाठी आरोग्य व कर्करोग या विषयावर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे व नगराध्यक्ष पवन अव्वलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, २८ डिसेंबर रोजी दुपारी १ ते ४ हे शिबिर होणार आहे. जळगाव येथील सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. नीलेश चांडक हे कर्करोग होऊ नये म्हणून महिलांनी कोणती विशेष काळजी घ्यावी, तसेच कर्करोगाची लक्षणे, कारणे व त्यावरील उपाय, याविषयी स्लाईड शोद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. परिसरातील लोकांनी या शिबिराला उपस्थित राहून कर्करोगाबाबतच्या आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आयोजकांनी कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Cancer awareness camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.