भारत-पाकिस्तान क्रिकेटमालिका रद्द का ?

By Admin | Updated: December 13, 2015 18:41 IST2015-12-13T18:21:38+5:302015-12-13T18:41:37+5:30

भारतीय क्रिकेट मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेचा विचार सोडून दिल्याचे वृत्त आहे.

Cancellation of India-Pakistan Cricket Hall? | भारत-पाकिस्तान क्रिकेटमालिका रद्द का ?

भारत-पाकिस्तान क्रिकेटमालिका रद्द का ?

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १३ - भारतीय क्रिकेट मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेचा विचार सोडून दिल्याचे वृत्त आहे. आम्ही आता हा विषय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपर्यंत यासंबंधी अधिकृत घोषणा केली जाईल असे पीसीबीचे प्रमुख शहरयार खान यांनी सांगितल्याचे वृत्त एका प्रसिध्द इंग्रजी नियतकालिकाने दिले आहे. 

भारतासोबत क्रिकेट मालिका व्हावी यासाठी आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले. बीसीसीआयच्या विनंतीवरुन यूएईऐवजी श्रीलंकेतही मालिका खेळण्यास तयार झालो. पण आमचे सर्व प्रयत्न वाया गेले. 
भारतासोबत मालिका खेळण्यासाठी मागच्या वर्षी आम्ही करार केला होता असे शहरयार खान यांनी सांगितले. हा निर्णय भारत, पाकिस्तान आणि जगभरातील कोटयावधी क्रिकेटरसिकांचा भ्रमनिरास करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Cancellation of India-Pakistan Cricket Hall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.