शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निकाल रद्द की, यादीत दुरुस्ती तलाठी भरती : प्रशासनाचे चाचपडणे सुरूच

By admin | Updated: April 15, 2016 23:35 IST

नाशिक : तलाठी भरतीत उमेदवारांची निवड करताना झालेल्या गैरप्रकाराचे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच, चाचपडणार्‍या प्रशासनाने उलट-सुलट निर्णय घेऊन हजारो उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. जाहीर केलेली निवड यादी अंतिम नाही असे एकीकडे सांगत असतानाच तलाठी भरतीची निवड यादी रद्द केल्याचे जाहीर करणार्‍या प्रशासनाने दुसरीकडे अन्याय झालेल्या उमेदवारांकडून लेखी तक्रारीही मागितल्या आहेत. त्यामुळे प्रशासन नेमके काय करणार याविषयी स्पष्ट उलगडा होत नाही.

नाशिक : तलाठी भरतीत उमेदवारांची निवड करताना झालेल्या गैरप्रकाराचे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच, चाचपडणार्‍या प्रशासनाने उलट-सुलट निर्णय घेऊन हजारो उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. जाहीर केलेली निवड यादी अंतिम नाही असे एकीकडे सांगत असतानाच तलाठी भरतीची निवड यादी रद्द केल्याचे जाहीर करणार्‍या प्रशासनाने दुसरीकडे अन्याय झालेल्या उमेदवारांकडून लेखी तक्रारीही मागितल्या आहेत. त्यामुळे प्रशासन नेमके काय करणार याविषयी स्पष्ट उलगडा होत नाही. लिपिक व तलाठी भरतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर उघड झालेल्या बाबींमुळे अडचणीत आलेल्या प्रशासनाने आता कालापरत्वे भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. जाहीर झालेली निवड यादी अंतिम नाही, त्यात फेरबदल होऊ शकतो असे एकीकडे सांगतानाच, संपूर्ण निवड यादीच रद्द करून २१ एप्रिलनंतर नव्याने यादी जाहीर करण्याचा मनोदयही प्रशासनाने बोलून दाखविला आहे. या निवड यादी विषयी प्रामुख्याने कमी गुण मिळालेल्यांना थेट नियुक्ती देतानाच, परीक्षेला अनुत्तीर्ण असलेल्यांची वर्णी प्रतीक्षा यादीत लावण्याचा प्रकार घडला आहे. एवढेच नव्हे तर पेसा क्षेत्राची बाबही उमेदवारांपासून दडवून ठेवून, हजारो विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळण्यात आले आहे. गुणवत्ता प्राप्त करूनही हजारो उमेदवारांची निवड यादीत वर्णी लागू शकलेली नाही. त्यामुळे पेसा क्षेत्रातील उमेदवारांबाबत प्रशासन काय निर्णय घेणार हेदेखील गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे निवड यादीविषयी तक्रारी घेऊन गेलेल्या उमेदवारांना लेखी तक्रारी करा म्हणून सल्ला देण्यात येत असून, त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणार म्हणजे काय याविषयीही कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे परीक्षा शुल्क भरून परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत घेणार्‍या व गुणवत्ता मिळालेल्या उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. निवड यादी रद्द केली तर त्यासाठ पात्र ठरलेले उमेदवार त्याविरुद्ध न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यातही ज्यांची निवड झाली आहे व गुणवत्ता पात्र असूनही ज्यांना डावलण्यात आले, त्यांना फेर यादीत सामावून घेण्याचा प्रकार म्हणजे निवडीतील गैरप्रकाराची कबुली दिल्यासारखेच होणार आहे. प्रशासन या सार्‍या प्रकारात चाचपडत असल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.