सेतू सुविधा केंद्राचे टेंडर रद्द करा : छावाची मागणी
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:52+5:302015-08-08T00:23:52+5:30
लातूर : जिल्ातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरु करण्याबाबत टेंडर करण्यात आले आहे़ जिल्ातील मागील दहा ते पंधरा वर्षांपासून एकाच कंपनीला हे काम देण्यात आले आहे़ या संस्थेची मुदतवाढ संपली असतानाही वाढीव मुदत देऊन कामकाज केले जात आहे़ त्यामुळे या सेतू सुविधा केंद्राच्या कामाचे टेंडर रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली़

सेतू सुविधा केंद्राचे टेंडर रद्द करा : छावाची मागणी
ल तूर : जिल्ातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरु करण्याबाबत टेंडर करण्यात आले आहे़ जिल्ातील मागील दहा ते पंधरा वर्षांपासून एकाच कंपनीला हे काम देण्यात आले आहे़ या संस्थेची मुदतवाढ संपली असतानाही वाढीव मुदत देऊन कामकाज केले जात आहे़ त्यामुळे या सेतू सुविधा केंद्राच्या कामाचे टेंडर रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली़ जिल्ातील सर्व तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रामार्फत विविध नमुन्याचे प्रमाणपत्र काढण्यासाठी अवाजवी पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत़ तरीही या कंपनीला मुदतवाढ दिली जाते़ या कंपनीने आजपर्यंत जमा केलेल्या पैशाचे ऑडीट झाले नाही़ उदगीरसह अनेक तालुक्यातील सेतू केंद्रात सातबारा काढण्यासाठी ४० रुपये घेतला जात असल्याच्या तक्रारी आहेत़ शासनाकडून महाऑनलाईनच्या माध्यमातून प्रमाणपत्र काढण्याची सक्ती केली जात आहे़ तरीही खाजगी कंपनीकडून सेतू सुविधा केंद्र चालविण्यासाठी टेंडर का काढले जात आहे, असा प्रश्नही संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे़ काही जिल्ातील जिल्हाधिकार्यांनी सेतू सुविधा केंद्र बंद केले आहेत़ याच धर्तीवर लातूर जिल्ात कामकाज केले जावे, यापुढे सेतू सुविधा केंद्रातून नागरीकांची लुट होत असल्यास या प्रकाराविरुद्ध अखिल भारतीय छावा तीव्र आंदोलन छेडेल, असेही आपल्या निवेदनात म्हटले आहे़ यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश गोमसाळे, सिंधाजी जगताप, शंकर कदम, आकाश बिडवे, धनंजय जाधव, प्रतिक जाधव आदी कार्यकर्ते होते़