शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू धर्माचा अर्थ साधूसंतही सांगू शकणार नाहीत- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 04:56 IST

पंतप्रधान मोदी यांना हिंदू धर्म समजला नाहीत, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी जाहीर सभांतून सांगू लागले आहेत.

जयपूर : पंतप्रधान मोदी यांना हिंदू धर्म समजला नाहीत, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी जाहीर सभांतून सांगू लागले आहेत. पण हा धर्म इतका विशाल आहे आणि त्यात इतक्या विचारधारा आहेत की, त्याचा नेमका अर्थ सांगणे साधू-संतांनाही आतापर्यंत जमलेले नाही. बहुधा एकट्या गांधी यांनाच धर्म समजला असावा. अर्थात आम्हाला, भाजपाला केवळ एकच धर्म माहीत आहे आणि तो आहे विकासाचा धर्म. राज्याचा, देशाचा विकास हाच आमचा धर्म आहे, असा पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केले.राजस्थान व तेलंगणा या दोनच राज्यांमध्ये आता मतदान शिल्लक असून, भाजपाने आपली सारी ताकद राजस्थानात लावण्याचे ठरविले आहे. तिथे भाजपाची स्थिती चांगली नसल्याचे बोलण्यात येत असून, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा हे येत्या चार दिवसांत तिथे आणखी सभा घेण्याची शक्यता आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीही आज राजस्थानात सभा घेतल्या. आपला पुनर्जन्म महाराणा प्रताप यांच्या राजस्थानातच व्हावा, असे अमित शहा म्हणाले. या सभेत त्यांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवणेही शक्य झाले नसल्याने तो पक्ष जिंकूच शकणार नाही, असा दावा केला.>व्हील मोदींकडेचराजस्थानातील सर्वच भाजपा नेत्यांची भिस्त आता केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. आपल्याला मोदीच विधानसभाजिंकून देतील, असे त्यांना वाटत आहे.त्यामुळे राजस्थानच्या खडकाळ रस्त्यावर भाजपाच्या वाहनाचे व्हील त्यांनी जणू मोदी यांच्या हातीच दिले आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी