शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दोषींना पक्षप्रमुख होण्यापासून रोखू शकत नाही- सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 11:27 IST

गुन्हेगारी प्रकरणांतील दोषी व्यक्तींना राजकीय पक्षाचे प्रमुख होण्यापासून रोखण्यात यावं, या मागणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

ठळक मुद्देगुन्हेगारी प्रकरणांतील दोषी व्यक्तींना राजकीय पक्षाचे प्रमुख होण्यापासून रोखण्यात यावं, या मागणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. गुन्ह्यांत दोषी ठरलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांचे प्रमुख होण्यापासून रोखण्यात यावं, अशी मागणी करणारी याचिका वकील अश्विनी उपाध्याय यांनी कोर्टात दाखल केली होती.

नवी दिल्ली- गुन्हेगारी प्रकरणांतील दोषी व्यक्तींना राजकीय पक्षाचे प्रमुख होण्यापासून रोखण्यात यावं, या मागणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 'अशा प्रकरणांत सरकार किंवा संसदेने निर्णय घेतले पाहिजेत. गुन्हेगारी प्रकरणातील दोषींना पक्षप्रमुख होण्यापासून रोखू शकतो का? हे स्वातंत्र्यावर बंधन लादल्यासारखं नाही का? कुणालाही राजकीय विचार मांडण्यापासून कोर्ट रोखू शकतो का, असे सवाल सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारले.

गुन्ह्यांत दोषी ठरलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांचे प्रमुख होण्यापासून रोखण्यात यावं, अशी मागणी करणारी याचिका वकील अश्विनी उपाध्याय यांनी कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी कोर्टात सुनावणी झाली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि ए.एम. खानविलकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. 'सुरेश कलमाडी, ए. राजा, जगन रेड्डी, मधु कोडा, अशोक चव्हाण, अकबरुद्दीन ओवेसी, कनिमोळी, अधीर रंजन चौधरी, वीरभद्र सिंह, मुख्तार अन्सारी, मोहम्मद शहाबुद्दीन, मुलायम सिंह यादव या नेत्यांवर कोर्टात खटले दाखल आहेत. तरी ते राजकीय पक्षांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत, याकडे याचिकाकर्त्याने लक्ष वेधलं आहे. दोषी व्यक्तींना निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली आहे, असाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

राजकीय पक्षाला मान्यता देणं किवा ती रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, अशी तरतूद लोकप्रतिनिधी कायद्यात आहे. त्याबाबत कोर्टाने विचार करावा, असंही याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. यासंबंधी निवडणूक आयोगानेही २००४ मध्ये लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीत बदल करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

दरम्यान, राजकीय पक्षाची मान्यता रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाराच्या मुद्द्यावर विचार करण्याची तयारी न्यायालयाने दर्शवली आहे. यावर निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडून सूचनाही मागवल्या आहेत. गेल्यावर्षी निवडणूक आयोगाने 2005 नंतर कुठलंही स्थानिक किंवा राष्ट्रीय निवडणूक न लढविणाऱ्या पक्षांची मान्यता रद्द केली होती. विशेष अधिकाराअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला होता, ज्याला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय