..तर रेल्वेवर बंदी घालणार का?

By Admin | Updated: December 10, 2014 02:38 IST2014-12-10T02:38:38+5:302014-12-10T02:38:38+5:30

दिल्लीत उबर कॅब सव्र्हिसवर बंदी आणण्याच्या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी परस्परांसमोर उभे ठाकले आहेत.

Can not ban the railways? | ..तर रेल्वेवर बंदी घालणार का?

..तर रेल्वेवर बंदी घालणार का?

गडकरी-राजनाथ यांच्यात जुंपली : उबर कॅबच्या सव्र्हिसवर भाजपात परस्पर विरोधी मते
हरीश गुप्ता - नवी दिल्ली
दिल्लीत उबर कॅब सव्र्हिसवर बंदी आणण्याच्या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. राजनाथ यांनी देशभरातील अन्य शहरांमध्येही उबरवर बंदी आणण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगताच गडकरी यांनी जाहीरपणो त्याला विरोध केला. या दोघांमध्ये जाहीर जुंपल्याने केंद्रीय मंत्रिमंडळातील धुसफूस उघड झाली आहे. दिल्लीत उबर कॅबमध्ये 27 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्यानंतरच्या वादाला आता सत्तांतर्गत राजकीय वादाचे वळण लाभले आहे. 
 बंदीच्या निर्णयाला विरोध करताना गडकरी म्हणाले, रेल्वे अपघाताबद्दल रेल्वेवर, बस अपघाताबद्दल बसवर किंवा बलात्कारासारख्या घटना घडल्यामुळे टॅक्सी सेवेवर बंदी आणणो चुकीचे आहे. बंदी हा काही तोडगा ठरत नाही. दिल्लीतील उबर कॅबमधील घटनेचे पडसाद गेल्या 36 तासांपासून उमटत असून, उबरची सेवा असलेल्या जगभरातील 2क्क् शहरांमध्ये त्याचे धक्के जाणवत आहे.
 
उबरने नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट करीत राजनाथसिंग यांनी याप्रकरणी गृहमंत्रलय कोणती पावले उचलणार त्याची विस्तृत माहिती दिली. उबरच्या सेवेवर बंदी आणण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारांना पत्रे पाठविण्यात आली आहेत, असेही त्यांनी नमूद केले. 
 
सर्वप्रथम दिले वृत्त
उबरच्या मुद्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात दुही उफाळली असल्याचे वृत्त सर्वप्रथम लोकमतनेच दिले होते.
‘उबर’वर कारवाईसाठी पोलिसांची चाचपणी
1‘उबर’ या कॅब सव्र्हिसविरुद्ध काय कोणतीही कायदेशीर कारवाई करता येईल, या दिशेने दिल्ली पोलिसांची पडताळणी सुरू आह़े 27 वर्षीय महिलेवर बलात्कार करणा:या या कंपनीच्या कॅबचालकाकडे पोलिसांचे बनावट कॅरेक्टर सर्टिफिकेट आढळले आहे, ते त्याने कसे मिळवले, याचाही दिल्ली पोलीस शोध घेत आहेत़ पोलीस आयुक्त बी़एस़ बस्सी यांनी मंगळवारी ही माहिती दिली़
 
2केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी  उबरवरील बंदीवर व्यक्त केलेल्या नाराजीबाबत विचारले असता, मला गडकरी काय बोलले ते ठाऊक नाही़ आम्ही उबरप्रकरणी कायदेशीर पैलूंवर विचार करीत आहोत, असे बस्सी म्हणाल़े
 
3बलात्कार प्रकरणातील आरोपीकडे असलेले पोलिसांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट बनावट असल्याचे आढळले आह़े यासंदर्भात एक एफआयआर नोंदविण्यात आला आहे, असे बस्सी यांनी सांगितले.
 
शिवकुमारविरुद्ध बलात्काराशिवाय आणखी अनेक गुन्हे
च्गुडगावच्या खासगी कंपनीतील 
27 वर्षीय महिलेवर कॅबमध्येच बलात्कार करणारा आरोपी शिवकुमार यादव याच्याबद्दल दिवसागणिक नवे खळबळजनक खुलासे होऊ लागले आहेत़ शिवकुमार सिरियल रेपिस्ट असल्याचे समोर आले आह़े 
 
च्त्याच्याविरुद्ध केवळ बलात्काराचेच नाही तर छेडखानी, लुटमार शिवाय शस्त्र कायद्यांतर्गतही अनेक गुन्हे दाखल केले आह़े 2क्11 मध्ये एका बलात्कारप्रकरणात तो आरोपी आह़े 2क्13 मध्येही बलात्काराच्याच एका प्रकरणात सध्या तो जामिनावर आह़े गतवर्षी त्याने उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथे एका महिलेवर कथितरीत्या बलात्कार केला होता़
 
च्2क्11 मध्ये त्याने दिल्लीच्या महरौली भागात एका महिलेवर बलात्कार केला होता़ याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती़ यानंतर तो सात महिने तुरुंगात बंद होता़ मात्र नंतर तो निदरेष सुटला  होता़
 
‘उबर’चे दिवस फिरले, अमेरिकी न्यायालयात खटला
वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय टॅक्सी बुकिंग कंपनी ‘उबर’चे दिवस फिरले आहेत. नवी दिल्लीत बंदी घालण्यात येऊन एक दिवसही उलटला नसताना शहरात अवैधरीत्या सेवा सुरू केल्यावरून अमेरिकेच्या पोर्टलॅण्ड शहरानेदेखील या कंपनीवर खटला दाखल केला आहे. उबरने शुक्रवारीच ओरेगॉन प्रांतातील पोर्टलॅण्ड शहरात आपली चर्चीत सेवा सुरू केली होती. ‘उबर’ला शहराचे नियम पाळणो क्रमप्राप्त असून शहरांच्या नियमांची पुर्तता करेर्पयत तिला सेवा देता येणार नाही, असे निर्देश देण्याची विनंती या खटल्यामध्ये करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षा ही शहराची मुख्य चिंता असल्याचे पोर्टलॅण्डचे महापौर चार्ली हेल्स म्हणाले. टॅक्सी कॅब कंपन्यांनी सार्वजनिक आरोग्य व सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे. हॉटेल्स, बांधकाम कंपन्यांसह इतर अनेक सेवा पुरवठादार कंपन्या ज्याप्रमाणो नियमांचे पालन करतात त्याप्रमाणो या कंपनीनेही नियम पाळावेत. चांगले नियम आणि त्यांचे पालन यामुळे शहरे सुरक्षित बनतात हे सर्वजण मान्य करतात. मात्र, उबर या मुद्याशी सहमत नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयाकडून आदेश मागत आहोत, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
 
महिला आयोगाची पोलिसांना नोटीस
च्दिल्लीतील कॅब बलात्कार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून, यासंदर्भात दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आह़े 15 दिवसांच्या आत या प्रकरणी अहवाल सादर करावा, असे यात म्हटले आह़े
च्दिल्ली महिला आयोगानेही यासंदर्भात उबर या कॅब सव्र्हिस कंपनीच्या सीईओला समन्स बजावले आह़े आम्ही उबरच्या येथील सीईओला समन्स बजावले आह़े ही कंपनी बंद व्हावी, यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा शुक्ला म्हणाल्या़
 
राज्यसभेतही पडसाद : मोदी सरकारच्या काळात महिला असुरक्षितच
राजधानी दिल्लीत ‘उबर’ या कॅब सव्र्हिस कंपनीच्या कॅबचालकाने एका महिला प्रवाशावर बलात्कार केल्याच्या घटनेचे पडसाद मंगळवारी राज्यसभेतही उमटल़े राज्यसभेतील सर्व पक्ष सदस्यांनी या  घटनेवर तीव्र चिंता व्यक्त करीत दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली़
 
शून्य तासादरम्यान काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला़ दोषींची नावे जाहीर करणा:या एका संकेतस्थळाची यापूर्वीच्या संपुआ सरकारची योजना मोदी सरकारने गुंडाळल्याचा आरोप त्यांनी केला़ अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या देशात बलात्काराच्या दोषींची नावे संकेतस्थळावर जाहीर केली जातात़ सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने महिला सुरक्षेबाबत मोठ मोठी आश्वासने दिली होती़ प्रत्यक्षात महिला आणखी असुरक्षित झाल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला़ 

 

Web Title: Can not ban the railways?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.