कधीही होऊ शकतं भारत - पाकिस्तान युद्ध
By Admin | Updated: March 2, 2017 14:35 IST2017-03-02T13:57:23+5:302017-03-02T14:35:34+5:30
पाकिस्तान आपल्या शत्रुंविरोधात रासायनिक हत्यांराचा वापर करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे

कधीही होऊ शकतं भारत - पाकिस्तान युद्ध
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - पाकिस्तान आपल्या शत्रुंविरोधात रासायनिक हत्यांराचा वापर करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी केलेल्या वक्तव्यामुळे या शक्यतेला बळ मिळालं आहे. डीआरडीओच्या कार्यक्रमात मनोहर पर्रीकर बोलले आहेत की, 'अफगाणिस्तान आणि उत्तरेकडील भागातून रिपोर्ट येत आहेत, मी काही फोटो पाहिले आहेत ज्यामध्ये स्थानिक लोक रासायनिक शस्त्र वाहून नेताना दिसत आहेत. या क्षणाला माझ्याकडे कोणतीही ठोस माहिती नाही, मात्र हे फोटो विचलित करणारे आहेत. आपण कोणत्याही प्रकारच्या युद्दासाठी सज्ज राहणं गरजेचं असल्याचं', मनोहर पर्रीकर बोलले आहेत.
In view of some reports coming in from certain parts of Afghanistan and northern parts where I have seen photos (cont): Manohar Parrikar pic.twitter.com/a5Da6DSXuI
— ANI (@ANI_news) March 2, 2017
नुकतंच काही दिवसांपुर्वी पाकिस्ताकडून अफगाणिस्तानलगत असलेल्या भागांमध्ये दहशतवाद्यांविरोधात जबरदस्त कारवाई करत ऑपरेशन चालवल्याची माहिती समोर आली होती. शाहबाज कलंदरमधील दर्ग्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने कारवाई करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
At this moment,I have no confirmation on the matter but photos were quite disturbing, we should be prepared for any kind of warfare:Parrikar pic.twitter.com/B9ehAfYpK8
— ANI (@ANI_news) March 2, 2017
मनोहर पर्रीकरांनी युद्धासाठी सज्ज राहा असं सांगितलं असलं तरी आपल्याकडे ठोस माहिती नसल्याचंही ते बोलले आहेत. पर्रीकर बोलले आहेत की, 'देशावर अण्वस्त्र, रासायनिक किंवा जैविक हल्ल्याचा धोका असो किंवा नसो, मात्र भविष्यात कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार राहिलं पाहिजे'.