शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पटेलांचा राजकीय द्वेषासाठी वापर करणे मोदींना शोभते?-सिंगवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 04:34 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या हयातीत सांप्रदायिक विचारांच्या हिंदू महासभा व मुस्लिम लीगला कडाडून विरोध केला.

नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या हयातीत सांप्रदायिक विचारांच्या हिंदू महासभा व मुस्लिम लीगला कडाडून विरोध केला. दोन्ही संघटनांच्या विरोधात अनेक लेख लिहिले. रा.स्व. संघ अन् नेताजी सुभाषबाबूंची विचारसरणी पूर्णत: भिन्न होती. नेताजींनी काही काळ काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले.त्यानंतर ज्या फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली तो पक्ष आजही भाजपच्या कट्टर विरोधात उभा असलेला डाव्या विचारांचा पक्ष आहे. स्वातंत्र्यापूर्वी दिवंगत झालेल्या सुभाषबाबूंना अन् देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीआधीच ज्यांचे देहावसान झाले, त्या वल्लभभाई पटेलांच्या प्रतिमेचा केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी वापर करणे पंतप्रधानांना शोभते काय? असा हल्ला काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंगवी यांनी केला.पंतप्रधान मोदींनी आझाद हिंद सेनेच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात काँग्रेसवर जे आरोप केले ते धादांत असत्य असल्याचे नमूद करीत सिंगवी म्हणाले, आझाद हिंद सेनेवर ब्रिटिशांनी देशद्रोहाचा खटला भरला. लाल किल्ल्यात चाललेल्या या खटल्याच्या कामकाजाला आयएनए ट्रायल म्हणून संबोधले जाते. या खटल्यात पंडित नेहरू वकील या नात्याने आझाद हिंद सेनेच्या बाजूने उभे राहिले होते. पंतप्रधान या नात्याने पंडित नेहरूंनी स्वातंत्र्य चळवळीतील सुभाषबाबूंच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता.सुभाषबाबूंवर बोलण्याआधी मोदींनी त्यांचे खरे व्यक्तिमत्त्व समजावून घ्यायला हवे होते. आपल्या हयातीत नेताजींनी नॅशनल प्लॅनिंग समितीची निर्मिती केली होती. स्वातंत्र्यानंतर त्याचे प्लॅनिंग कमिशनमध्ये रूपांतर झाले. मोदींनी मात्र हे प्लॅनिंग कमिशन उद्ध्वस्त करून त्याला निति आयोगाचे स्वरूप दिले, असेही सिंगवी म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस