शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणूनच प्रत्येक जण मोदींना निवडतो;लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रचाराचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 08:22 IST

यावेळी भाजपचे खास निवडणूक थीम साँगही रिलीज करण्यात आले.

नवी दिल्ली : अयोध्येत श्रीरामांची नवीन मूर्ती विराजमान झाल्यानंतर आता भाजपने लोकसभा निवडणूक २०२४ साठी प्रचार सुरू केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ केला. 

यावेळी भाजपचे खास निवडणूक थीम साँगही रिलीज करण्यात आले. ‘स्वप्ने नव्हे तर वास्तव विचार करतो - म्हणूनच प्रत्येकजण मोदींना निवडतो’. ही घोषणा प्रत्यक्षात जनतेतूनच आल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. भाजपने सांगितले की, लोकांच्या भावना समजून पक्षाने ही घोषणा स्वीकारली आहे. नवीन घोषणा पक्षाच्या मोदी हमी मोहिमेला पूरक असल्याचे पक्षाने म्हटले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पूर्ण बहुमताने स्थिर सरकार निवडण्यावर जोर देत तरुण मतदारांना लोकसभा निवडणुकीत घराणेशाही पक्षांना पराभूत करण्याचे आवाहन केले. तरुणांची मते भारताची स्थिती आणि दिशा ठरवतील, असे ते म्हणाले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित ‘नमो नवमतदाता संमेलना’ला  ते संबांधित करत होते.

तुमची स्वप्ने हा माझा संकल्प आहेभाजपच्या जाहीरनाम्यासाठी सूचना देण्याचे आवाहन मोदींनी केले. सर्वोत्तम सूचना शेअर करणाऱ्या निवडक लोकांना वैयक्तिकरीत्या भेटणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आजकाल विविध क्षेत्रातील विश्वासार्हता आणि यशोगाथा याबद्दल बोलले जाते. तुमची स्वप्ने हा माझा संकल्प आहे. ही मोदींची हमी आहे.

तरुणांसाठी अहोरात्र काम करत आहोत“तरुणांना नेहमीच आपले प्राधान्य राहिले आहे. विविध क्षेत्रातील सुधारणांमुळे त्यांच्यासाठी अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत.आमचे सरकार त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता वाढविण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. भाजपच्या विकासाच्या अजेंड्याला मतदारांचा पाठिंबा आहे,” असेही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाElectionनिवडणूक