मनपा राबविणार रेनवॉटर हार्वेस्टिंगची मोहीम
By Admin | Updated: April 26, 2016 00:15 IST2016-04-26T00:15:57+5:302016-04-26T00:15:57+5:30
जळगाव: राज्यात उद्भवलेल्या पाणीटंचाईच्या संकटापासून बोध घेत मनपाने शहरात पावसाचे पाणी जिरवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात सोमवारी सायंकाळी आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मनपा नगररचना विभागाचे अधिकारी तसेच रोटरीचे सदस्य, अन्य सामाजिक कार्यकर्ते तसेच अभियंते उपस्थित होते. त्यात ही मोहीम प्रभावीपणे कशी राबविता येईल? यावर चर्चा झाली. मनपाकडे जमा आलेल्या रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या निधीतून जुन्या इमारतींवर ही यंत्रणा बसविण्याबाबतची चर्चा झाली.

मनपा राबविणार रेनवॉटर हार्वेस्टिंगची मोहीम
ज गाव: राज्यात उद्भवलेल्या पाणीटंचाईच्या संकटापासून बोध घेत मनपाने शहरात पावसाचे पाणी जिरवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात सोमवारी सायंकाळी आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मनपा नगररचना विभागाचे अधिकारी तसेच रोटरीचे सदस्य, अन्य सामाजिक कार्यकर्ते तसेच अभियंते उपस्थित होते. त्यात ही मोहीम प्रभावीपणे कशी राबविता येईल? यावर चर्चा झाली. मनपाकडे जमा आलेल्या रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या निधीतून जुन्या इमारतींवर ही यंत्रणा बसविण्याबाबतची चर्चा झाली.